2corona_agencies_1.jpg 
सोलापूर

होम क्‍वारंटाईन अन्‌ इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनचा विसर ! शहरात आज पुन्हा दोघांचा मृत्यू; 42 जण पॉझिटिव्ह

तात्या लांडगे

सोलापूर : शहरात आता को- मॉर्बिड (गंभीर आजार असलेले तथा संशयित) रुग्णांचीच कोरोना टेस्ट केली जा आहे. आज 565 संशयितांची टेस्ट झाली असून त्यात 42 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यात शेळगीतील बसवेश्‍वर नगरातील 58 वर्षीय पुरुषाचा आणि जुळे सोलापुरातील (प्रेम नगर) 77 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने बळी घेतला आहे. रुग्णाच्या संपर्कातील किमान आठ ते दहा संशयितांना होम तथा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले जाते. मात्र, सद्यस्थितीत शहरातील 69 संशयित होम क्‍वारंटाईन असून 184 संशयित होम आयसोलेशन व इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत.

ठळक बाबी...

  • शहरातील 81 हजार 166 संशयितांची कोरोना टेस्ट
  • आतापर्यंत शहरात आढळले आठ हजार 561 रुग्ण
  • एकूण रुग्णांपैकी सात हजार 230 रुग्णांची कोरोनावर मात
  • सद्यस्थितीत शहरातील 850 रुग्णांवर सुरु आहेत उपचार
  • आज 42 पॉझिटिव्ह तर 58 वर्षीय आणि 77 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू


आज शहरात होटगी नाका (महिला वसतीगृह), विनायक नगर (एमआयडीसी रोड), सप्तगिरी सोसायटी (होटगी रोड), सुनिल नगर (एमआयडीसी), वारद चाळ (मुरारजी पेठ), निराळे वस्ती, तोडकर वस्ती (बाळे), वसंत विहार, कलावती नगर (सुनिल नगर), सोरेगाव, स्वामी विवेकानंद नगर (सैफूल), विजया हौसिंग सोसायटी, कोळी सोसायटी, महालक्ष्मी सोसायटी, वसंत नगर (विजयपूर रोड), नरसिंग नगर (जुळे सोलापूर), हेरिटेज रेसिडेन्सी (गांधी नगर), दिलीप नगर (कुमठे), निलम नगर, बापूजी नगर, रेल्वे लाईन्स, चौपाड, भारत नगर (विडी घरकूल), शोभा नगर (सात रस्ता), वामन नगर, उत्तर कसबा, अभिषेक नगर, लष्कर, मिलिंद नगर (बुधवार पेठ) आणि पश्‍चिम मंगळवार पेठ या ठिकाणी नव्याने रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, उपमहापौर राजेश काळे यांच्या प्रभागातच सर्वाधिक रुग्ण आढळल्याची नोंद महापालिकेच्या प्रभागनिहाय रुग्णसंख्येत दिसून येते. शहरातील मृतांची संख्या आता 481 झाली असून त्यात 325 पुरुषांचा आणि 156 महिला रुग्णांचा समावेश आहे. दुसरीकडे चार हजार 187 पुरुषांनी तर तीन हजार 43 महिलांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Travis Head: १९ नोव्हेंबरचा तो काळा दिवस भारतीय चाहते विसरले नाहीत; ट्रेव्हिस हेडने ३ वर्षांनंतर पोस्ट करत पुन्हा आठवण करून दिली

Torrent Project: टोरंट कंपनीला 730 एकर जमीन खरेदी करण्यास राज्य सरकारची मंजुरी; कर्जतच्या प्रकल्पामुळे वाद वाढणार

Marathi News Live Updates : नोकरीच्या आमिषाने दुबईत डांबलेल्या महिलेची सुखरूप सुटका

Lakshmi Narayan Yog 2026: अडकलेला पैसा मिळणार, उत्पन्नाचे नवे मार्ग खुलणार! तुळशी विवाहानंतर ५ राशींसाठी लक्ष्मी नारायण योग ठरणार शुभ

Khamgaon News : ज्ञानगंगा अभयारण्यात ‘रणवीर’ची एन्ट्री! ४९८ किलोमीटरचा प्रवास करत नैसर्गिकरीत्या दाखल, अभयारण्यातील वाघांची संख्या तीनवर

SCROLL FOR NEXT