Sangola Panchayat Samit 
सोलापूर

सांगोला पंचायत समितीमध्ये कोरोना ! दोन कर्मचारी पॉझिटिव्ह

दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शासन आदेश 27 मार्च 2021 मधील निर्देशानुसार पंचायत समिती, सांगोला कार्यालय 1 एप्रिल रोजी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. पंचायत समिती कार्यालयात तालुक्‍यातील ग्रामीण भागातून दररोज अनेकजण कामानिमित्त येत असतात. कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून आदेश प्राप्त झाल्यामुळे आता पंचायत समिती कार्यालयात प्रवेश करता येणार नाही. अशातच दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. 

1 एप्रिल रोजी पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांची कोव्हिड टेस्ट घेण्यात आली. एकूण 69 टेस्ट घेण्यात आल्या असून त्यापैकी दोन कर्मचाऱ्यांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे कार्यालयात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच यापुढे दररोज पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कोव्हिड चाचणी केली जाणार आहे. तालुक्‍यातील पदाधिकारी व ग्रामस्थांनी अत्यावश्‍यक कामाशिवाय पंचायत समिती कार्यालयात येऊ नये, आपले अर्ज, निवेदन किंवा ई-ऑनलाइन पाठवून द्यावेत. आपल्या अर्जांवर नियमानुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आवाहन गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी केले आहे. 

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काही कठोर उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंचायत समिती कार्यालय प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह अभ्यागतांना सुद्धा कोव्हिड टेस्ट केल्याशिवाय कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. 
- संतोष राऊत, 
गटविकास अधिकारी, पंचायत समिती, सांगोला 

आधी केले, मग सांगितले 
पंचायत समितीच्या सभापती राणी कोळवले व गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी काल कार्यालयात येताच आपल्या कोव्हिड चाचण्या करून घेतल्या. तसेच कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुद्धा चाचणी करून घेण्याची सूचना केली. त्यानुसार एका दिवसात 69 कोव्हिड चाचण्या करण्यात आल्या. गटविकास अधिकारी संतोष राऊत व पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोव्हिड लसीकरणाचे दोन्ही डोससुद्धा घेतले आहेत. नागरिकांनीसुद्धा कोव्हिड चाचणी करण्यास व लसीकरण करण्यात प्रशासनाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara: कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार! धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक; १२ तासात ७८७ मिमी पाऊस

Cabinet Reshuffle: ते दोन केंद्रीय मंत्री कोण? भाजप कार्यालयात पोहोचताच राजीनाम्याच्या चर्चांना उधाण

Marathi Live Updates : नागपूरात घरातून एक-दोन नव्हे, तब्बल चाळीस नागांची पिल्ले; परिसरात उडाली भीती, Video पाहा

नागपुरात एकाच कुटुंबातील ५ जण बेपत्ता, शेवटचं लोकेशन पुणे; १० दिवसांपासून शोध सुरू

Ketan Agrawal Case : पुण्यातील लोहगड केतन अग्रवाल प्रकरणानंतर 'राष्ट्रीय पुरुष आयोग' स्थापन होणार?, राज्यसभेत पडसाद; भाजप खासदारांकडून मागणी

SCROLL FOR NEXT