Clashed 
सोलापूर

ग्रामपंचायत निवडणुकीवरून नारी येथे दोन गटांत हाणामारी ! तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

बाबासाहेब शिंदे

पांगरी (सोलापूर) : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी मतदान केंद्रावर थांबण्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना नारी (ता. बार्शी) येथे घडली. याबाबत परस्पर विरोधी फिर्यादीवरून दोन गटांतील तीस जणांवर पांगरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत अण्णासाहेब दत्तात्रय साठे (वय 32, रा. नारी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की नारी गावच्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान केंद्रावर मतदान करून बाहेर आलो व मतदान केंद्राबाहेर थांबलो असता त्या वेळी अनिल लक्ष्मण कांबळे, सुनील लक्ष्मण कांबळे, संतोष लक्ष्मण कांबळे, प्रशांत बदाले, मंगेश पाटील, विशाल धर्मराज कदम, बाबासाहेब धर्मराज कदम, सुधीर बदाले, महादेव सुनील कांबळे, गोकुळ सुनील कांबळे (रा. सर्व नारी) यांनी तेथे येऊन तू बाहेर का थांबलास म्हणत शिवीगाळ करत लाथा- बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. या वेळी अमोल रानमाळ, अण्णा शिंदे, अनिल बारंगुळे, सुनील बारंगुळे हे सोडवायला आले असता अमोल रानमाळ, अण्णा शिंदे यांना डोक्‍यात दगड घालून जखमी केले. 

तर अनिल लक्ष्मण कांबळे (वय 40, रा. नारी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की माझी पत्नी सुवर्णा ही गाव कामगार कोतवाल आहे. गावच्या निवडणुकीचे मतदान असल्याने निवडणुकीसाठी बाहेरून आलेल्या स्टाफसाठी जेवणाची व इतर व्यवस्था मी पाहत असताना रामचंद्र धर्मराज माळी याने मला, तू दिवसभर इथे का थांबलास, बाहेर जा म्हटल्याने आमच्या दोघांत किरकोळ बाचाबाची झाली. या वेळेस मी शाळेच्या बाहेर आलो असता अनिल भास्कर बारंगुळे, सुनील भास्कर बारंगुळे, अमोल अनिल रानमाळ, अमित अरुण कदम, अण्णा शिंदे, सूरज मोरे, अण्णासाहेब दत्तात्रय साठे, दयानंद दिलीप शिंदे, बालाजी भास्कर शिंदे, पांडुरंग नानासाहेब बदाले, सुजित सुरेश बदाले, दादासाहेब विजय कुरुंद, रामहारी दिलीप शिंदे, अतुल नामदेव बदाले, बलभीम रामा बिरंजे, दिलीप शिंदे, रोहित लक्ष्मण साकतकर, महादेव प्रकाश कोंढारे, लखन पोपट शिंदे, केशव वामन कदम (रा. सर्व नारी) यांनी मला व माझे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या साथीदारांना शिवीगाळ करून लाथा- बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. या वेळी मंगेश पाटील, विशाल कदम यांना दगडाने मारहाण करून जखमी केले. 

या घटनेची पांगरी पोलिसांत नोंद झाली असून तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण शिरसट करत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dams Water Level : पुणेकरांसाठी मोठी बातमी! चारही धरणे 100% भरली; पण आज 'या' भागात पाणीच नाही

Farmer Accident Scheme: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अपघात सुरक्षा योजनेत आता संपूर्ण कुटुंबाला संरक्षण, 2031 पर्यंत मुदतवाढ

Mumbai Local Train Viral Video : माथेफिरुने रोखली लोकल ट्रेन, धाडसी प्रवाशामुळे टळली मोठी दुर्घटना; रुळांवरचा थरार कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Gold Rate Today: RBI च्या निर्णयानंतर ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदा सोन्याच्या भावात मोठा बदल! आज 10 ग्रॅमचा ताजा भाव किती?

Kolhapur Flood: हिप्परगी, आलमट्टीत पाणी साठ्याचे निकष धाब्यावर; ‘आंदोलन अंकुश’च्या पाहणीत स्पष्ट, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत महापुराचे संकट

SCROLL FOR NEXT