mobile theif 
सोलापूर

चोरट्यांचा मोबाईलवर डोळा ! घरातून मोबाईलसह रोकड लंपास; दुसरीकडे खिशातून पळविला मोबाईल 

तात्या लांडगे

सोलापूर : रंगभवन परिसरातील कब्रस्तानजवळील घरातून मोबाईल आणि रोख रक्कम चोरट्याने लंपास केली आहे. फक्रुद्दीन अब्दुलअजीज जमादार यांनी याबाबत सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली आहे. जेवण करून घरात मोबाईल बघत असताना त्यांना झोप लागली. त्या वेळी चोरट्याने मुख्य दरवाजातून घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्याने मोबाईल आणि तीन हजार सातशे रुपये चोरून नेले, अशी फिर्याद जमादार यांनी पोलिसांत दिली. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक श्री. वाडीकर हे करीत आहेत. 

चोरट्याने पळविला खिशातील मोबाईल 
शर्टाच्या खिशात जबरदस्तीने हात घालून चोरट्याने मोबाईल चोरून नेल्याची फिर्याद आशिष जयंतीलाल मेहता यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली आहे. मेहता हे शुक्रवारी (ता. 13) सकाळी साडेनऊच्या सुमारास राजाराम स्टेशनरी दुकानात (भांडे गल्ली, मधला मारुती) गेले होते. त्या वेळी अनोळखी व्यक्‍ती तिथे आली आणि तिने शर्टाच्या खिशात हात घालून 30 हजार रुपयांचा मोबाईल चोरून नेला, असेही फिर्यादीत नमूद आहे. त्यानुसार पोलिस नाईक श्री. मस्के पुढील तपास करीत आहेत. 

लहान मुलांच्या भांडणावरून मारहाण 
अंगणात खेळताना गल्लीतील लहान मुलांनी एका मुलीस मारहाण केली. मुलीस का मारले म्हणून विटाच्या तुकड्यांनी मारहाण केल्याची घटना सलगर वस्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शहा नगरात घडली. गणेश बसप्पा पाटील यांच्या फिर्यादीनुसार विनायक अशोक गायकवाड व लक्ष्मी ऊर्फ रेखा विनायक गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गणेश यांची मुलगी बाहेर अंगणात खेळत होती. त्या वेळी घराशेजारी राहणारे विनायक गायकवाड यांच्या मुलांनी तिला मारहाण केली. पाटील यांनी माझ्या मुलीस का मारहाण का केली, असे विचारणा केल्यानंतर शिवीगाळ देत त्यांनी दमदाटी केली. तसेच पत्नीलाही रेखा गायकवाड हिने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक श्री. यलगुलवार हे करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

भारतात सोन्याचं दर कमी होणार? RBI ने देशात परत आणलं १०४ टन सोनं

SCROLL FOR NEXT