corona-positive-1585803595 - Copy.jpg 
सोलापूर

सोलापूर मध्यवर्ती कारागृहातील दोन कैदी पॉझिटिव्ह! आज 54 पॉझिटिव्ह, तर दोघांचा मृत्यू

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग अद्यापही संपला नसून आज 984 जणांच्या अहवालात 54 जणांचे रिपोर्ट पाझिटिव्ह आले आहेत. जुळे सोलापूर, कुमठा, विजयपूर रोड, रेल्वे लाईन या परिसरात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. आज विजयपूर रोडवरील नम्रता सोसायटीतील 52 वर्षीय पुरुष, तर भवानी पेठेतील 44 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सोलापुरातील मध्यवर्ती कारागृहात दोन दिवसांपूर्वी दाखल झालेल्या दोन कैदी पॉझिटिव्ह आले असून त्यांना विलगीकरण कक्षात हलविण्यात आले आहे.

ठळक बाबी... 

  • आतापर्यंत शहरातील 60 हजार 294 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  •  शहरात आतापर्यंत आढळले सहा हजार 505 कोरोना पॉझिटिव्ह 
  • शहरातील पाच हजार 152 रुग्णांची कोरोनावर मात; आज 113 रुग्ण पोहचले घरी 
  • आज विजयपूर रोड, भवानी पेठेतील दोघांचा मृत्यू; एकूण मृतांची संख्या 408 झाली 
  • होम क्‍वारंटाईनमध्ये शहरातील तीन हजार 726 संशयित; दिडशे व्यक्‍ती आयसोलेशन क्‍वारंटाईन 

यशवंत हौसिंग सोसायटी (कुमठा नाका), श्रध्दा एम्पायर (रेल्वे लाईन), न्यू पाच्छा पेठ, भारती विद्यापीठजवळ (जुळे सोलापूर), बसवेश्‍वर नगर, अंत्रोळीकर नगर (होटगी रोड), उमा नगरी, आकाशवाणी केंद्राजवळ (एमआयडीसी), रंचना सोसायटी (आसरा), शरयू श्रीकांत नगर, साखर पेठ, सैफूल, वैष्णवी नगर, हत्तुरे वस्ती, आदित्य नगर, सोरेगाव, जवान नगर, सैनिक सोसायटी (विजयपूर रोड), कविता नगर पोलिस लाईन, संजय नगर (विजापूर नाका), तुकाराम अपार्टमेंट (चांदणी चौक), रेल्वे लाईन, हिरेहब्बू कॉम्प्लेक्‍सजवळ (बाळीवेस), मुमताज नगर (कुमठा नाका), बनशंकरी नगर, शुक्रवार पेठ, आसरा सोसायटी (सुरवसे शाळेजवळ), रामवाडी, लक्ष्मी नगर (बाळे), अक्षय सोसायटी, व्हीएमजीएससी महिला हॉस्टेल, जोडभावी पेठ, सोनी सिटी (दमाणी नगर), जुनी मिल चाळ, हरिपदम रेसिडेन्सी (सम्राट चौक), सोलापूर जेल, भूषण नगर, रेल्वे क्‍वॉर्टर, भवानी पेठ, चित्तूरचनम्मा नगर (सैफूल), दाजी पेठ, नटराज सोसायटी, धर्मराज नगर (शेळगी) येथे आज नव्या रुग्णांची भर पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Train Accident : एक्सप्रेसमध्ये आगीची अफवा पसरताच प्रवाशांच्या रुळावर उड्या, दुसऱ्या ट्रेनने अनेकांना चिरडले; ५ जणांचा जागीच मृत्यू

T20 WC, IND W vs PAK W, Playing XI: हरमनप्रीत कौरने टॉसही जिंकला, पण पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केलं की नाही?

US Iran Deal: अमेरिका-इराण कराराचा मोठा मसुदा तयार! होर्मुज स्ट्रेट खुले होणार; तेलबंदी हटणार, डीलमध्ये काय ठरलं?

Latest Live Updates Marathi: बंडखोर टीएमसी नेत्यांनी घेतली केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट

Waste Management: उरुळी कांचनमध्ये अत्याधुनिक घनकचरा प्रकल्पाला गती; देवस्थानकडून दोन एकर जागा

SCROLL FOR NEXT