Two kids burnt to death due to gas leak in Malshiras taluka 
सोलापूर

माळशिरस तालुक्‍यात गॅसगळतीमुळे दोन चिमुकल्यांचा भाजून मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा

माळशिरस (सोलापूर) : तरंगफळ (ता. माळशिरस) येथे गॅसगळती होऊन अचानक लागलेल्या आगीत दोन मुले भाजून मृत्युमुखी पडली, तर आई गंभीर जखमी झाली आहे. ही घटना आज सकाळी साडेसात वाजता (ता. 2) घडली. सावळा ज्ञानेश्वर शिंदे (वय 7) व कृष्णा ज्ञानेश्वर शिंदे (वय 5) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. तर, सोनाली ज्ञानेश्वर शिंदे (वय 30) असे जखमी झालेल्या आईचे नाव आहे. 
याबाबत मिळालेली माहिती अशी, सोनली शिंदे या सकाळी स्वयंपाक करीत असताना अचानक गॅसगळतीमुळे आगीचा भडका होऊ लागला. त्या वेळी त्या घराबाहेर होत्या, तर लहान मुले झोपेत होती. त्या मुलांना बाहेर काढण्यासाठी घरात गेल्या, त्या वेळी आगीचा भडका वाढतच होता. दरवाजातून बाहेर निघू शकत नसल्यामुळे ग्रामस्थांच्या मदतीने घराची मागील भिंत पाडून आई व मुलांना बाहेर काढण्यात आले. मात्र तिघेही जास्त भाजल्यामुळे गंभीर अवस्थेत होते. त्यांना त्वरित अकलूज येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. शासकीय हॉस्पिटलमध्ये सावळा शिंदे याचा मृत्यू झाला. नंतर आई सोनाली व मुलगा कृष्णा या दोघांना सोलापूर येथील शासकीय हॉस्पिटलकडे घेऊन जात असताना कृष्णा याचा मृत्यू झाला. आई गंभीर अवस्थेत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 
या घटनेचा पंचनामा मंडलाधिकारी श्री. लकडे यांनी केला असून, घरातील तीन लाख रुपये रोख जळून खाक झाले आहेत, तर शेजारच्या घराचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Mumbai Protest: मुंबईत 'सीजेपी'चा एल्गार! मंत्रालयाबाहेर 'जेन नेक्स्ट' एकवटले; अभिजित दीपकेंचं मोठं विधान, म्हणाले...

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठे खिंडार, माजी मंत्र्यांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Raj Thackeray: मुंबई पोलिसांच्या विनंतीला मान देत...; ठाकरे बंधूंच्या 'गर्जना' मोर्चाच्या मार्गात बदल, राज ठाकरेंची महत्त्वाची माहिती

LPG-PNG Gas Connection: सिलिंडर संपण्याची चिंता मिटणार! आता घरातच मिळणार गॅस; सरकारची मोठी मोहीम, घरबसल्या असा करा अर्ज

IND vs PAK, Asian Games : मोहसिन नक्वीला 'अपमान' डोळ्यासमोर दिसला, भारत-पाकिस्तान लढतीपूर्वीच पळ काढला; नेमकं काय केलं?

SCROLL FOR NEXT