Solapur Accident sakal
सोलापूर

Solapur Accident : कंटेनर-जीप अपघात दोघांचा जागीच मृत्यू ; रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंधळगाव येथील घटना

रत्नागिरी-नागपूर महामार्गावर मंगळवेढा तालुक्यातील आंधळगावजवळ ट्रेलर व जीपमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले.

सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा : रत्नागिरी-नागपूर महामार्गावर मंगळवेढा तालुक्यातील आंधळगावजवळ ट्रेलर व जीपमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी (ता. २७) पहाटे चारच्या सुमारास आंधळगावजवळ घडला. या अपघाताची फिर्याद चौडाप्पा कुंभार (रा. गौडगाव, ता. अक्कलकोट) यांनी मंगळवेढा पोलिसात दिली आहे.

फिर्याद चौडाप्पा कुंभार यांची नातेवाइक संगीत कुंभार यांना कराड येथून घेऊन जीप अक्कलकोटकडे निघाली होती. आंधळगावजवळ रस्त्यालगत पवनचक्कीचे साहित्य घेऊन चाललेला कंटेनर (जीजे १८/पीटी ८७८२) थांबला होता. त्याला मागून आलेल्या जीपने (केए २७/बी ६१८८) जोराचे धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू तर तीनजण गंभीर जखमी झाले. ही जीप कर्नाटक राज्यातील आहे. अपघात इतका भीषण होता की जीपचा समोरचा भाग कंटेनरच्या खाली घुसला होता. शेवटी जेसीबी बोलावून जीपला ओढून जखमी चालक आणि दोन लहान बालकांना बाहेर काढावे लागले.

अपघाताची माहिती मिळताच सांगोला ग्रामीण रुग्णालयाची १०८ क्रमांक रुग्णवाहिकेचे डॉ. वैभव जांगळे व चालक सूरज कुंभार यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पोलिसांच्या मदतीने जखमींची मदत केली. दरम्यान, कंटेनर चालक इंद्रजितकुमार कृष्णा सिंग (मझौली बिघा, ता. बाढ, जि. पटना, बिहार) याचे रस्त्याच्या बाजूला इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने रिफ्लेक्टर न लावता वाहन लावल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम धापटे तपास करत आहेत.

नागपूर- रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावर आंधळगाव परिसरामध्ये अद्ययावत रुग्णवाहिका तैनात करण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून होत आहे. मात्र आरोग्य विभागाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे या भागात अपघात झाल्यास सांगोला किंवा दूरवरच्या रुग्णवाहिकेला पाचारण करावे लागते. परिणामी अपघातातील जखमीला जीवितास मुकावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मृत अन्‌ जखमींची नावे

अपघातात चंद्रकांत श्रीमंत कुंभार (रा. घत्तरगा, ता. अफजलपूर, जि. कलबुर्गी) व संगीता चौडाप्पा कुंभार यांचा जागीच मृत्यू झाला तर चालक महिबूब मणियार (अफजलपूर), शंकर चौडाप्पा कुंभार व श्रावणी चौडाप्पा कुंभार हे तिघे गंभीर जखमी झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune weather: जूनच्या स्वागताला पावसाची चाहूल; पुण्यात मेघगर्जना आणि विजांचा इशारा, नैऋत्य मोसमी पावसाची प्रगती

IPL 2026: RR चा फक्त १ कोटीचा जुगार; १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने ३३.८७ कोटींचा नफा कसा कमावला? पाहा संपूर्ण गणित

Ahilyanagar Crime: अहिल्यानगरात थरारक घटना; मुरुम चोरी उघडकीस आणणाऱ्या तरुणांचा पाठलाग जीवावर बेतला, जेसीबीच्या धडकेत एकाचा मृत्यू

मुलीला वाचवायला ५ जणांनी नदीत उड्या मारल्या, पाचही जण बुडाले, मुलगी वाचली

Latest Marathi News Live Update : ओबीसी आणि मराठा समाजात संघर्ष पेटवून सत्तेची खुर्ची मजबूत करण्याचा सरकारचा डाव; वडेट्टीवारांचा आरोप

SCROLL FOR NEXT