vneera nadit mrutyu.jpg 
सोलापूर

नीरा नदीच्या पात्रात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू 

मनोज गायकवाड

श्रीपूर (सोलापूर) :  अकलूज येथे नीरा नदी पात्रात पोहण्यास गेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना आज घडली आहे. शक्ती चंद्रकांत गवळी (वय 16), करण रणजित लांडगे (वय 14 ) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. 

महर्षि काॅलनी परिसरातील शक्ती चंद्रकांत गवळी, करण रणजित लांडगे, अवधुत हिरा कांबळे व भैया जगन खंडागळे हे चौघेजण दुपारी नीरा नदीच्या पात्रात पोहण्यास गेले होते. नदीच्या घाटापासून थोडे अंतर पुढे गेल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. 

हेही वाचाः माझी रायगडवारी 

त्यामुळे शक्ती गवळी व करण लांडगे हे पाण्यात बुडाले. अवधुत कांबळे व भैया खंडागळे यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तो व्यर्थ ठरला. त्यानंतर या दोघांनी पात्रातून बाहेर येऊन घरी फोन लावला. त्यानंतर महर्षीनगर परिसरातील अनेक तरूणांनी नदी घाटाकडे धाव घेतली. 
काही तरुणांनी पाण्यात शोध घेतला असता, या दोघांचे मृतदेह सापडले. यावेळी शक्ती आणि करणच्या परिवाराला शोक अनावर झाला होता. या दुर्घटनेमुळे महर्षी का×लनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT