Two more corona patients in Solapur 
सोलापूर

सोलापुरात कोरोनाचा चौथा मृत्यू; बापूजीनगर परिसरातील आज आढळले नवीन दोन कोरोनाबाधित

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापुरातील शास्त्रीनगर परिसरातील वृद्ध महिलेचा आज सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सारीची संशयित रुग्ण म्हणून या महिलेला सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बापूजी नगर परिसरात आणखीन दोन कोरोना बाधित रुग्ण आज आढळले असून सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ४१ झाली असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
आज दिवसभरात कोरोना चाचणीचे १०० रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यापैकी ९८ रिपोर्ट निगेटिव्ह असून दोन रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. आज मृत्यू झालेल्या शास्त्रीनगर परिसरातील महिलेला २० एप्रिल रोजी सारीच्या संशयावरून उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४१ झाली असून आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित ३७ जणांवर सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. सध्या होम क्वारंटाइनमध्ये पंधराशे पाच व्यक्ती आहेत. इंस्टीट्यूट क्वारंटाइनमध्ये सहाशे तेवीस एवढ्या व्यक्ती आहेत. अद्यापही एकशे सत्यानव व्यक्तींचे कोरोना चाचणी रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. आयसोलेशन वॉर्डातील आकराशे चार व्यक्तीपैकी व्यक्तींपैकी नउशे सात जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून आठशे सहासष्ट जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत तर एक्केचाळीस जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT