manoj-patil-nagar-sp1_202009490371 - Copy.jpg
manoj-patil-nagar-sp1_202009490371 - Copy.jpg 
सोलापूर

मोठी ब्रेकिंग ! मोहोळ पोलिस ठाण्यातील दोन अधिकारी व एक पोलिस कर्मचारी निलंबीत

तात्या लांडगे

सोलापूर : तक्रारदाराच्या तक्रारीनंतर संशयित आरोपीविरुध्द मोहोळ पोलिस ठाण्यात एनसी दाखल करण्यात आली. त्यानंतर संबंधित संशयित आरोपीला अटक करुन जेलमध्ये टाकले. त्याला जाणिवपूर्वक त्रास दिल्याचा ठपका ठेवत मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सागर ढाकणे, सहायक पोलिस निरीक्षक सलीम शेख आणि पोलिस नाईक सुहास पवार या तिघांना निलंबीत केल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

मोहोळ तालुक्‍यातील आष्टी (शेटफळ) येथील ग्रामपंचायतीच्या जागेत अनिकेत पाटील यांनी मुरुम टाकला होता. त्यानंतर तक्रारदाराने ती जागा माझी आहे म्हणून तिथे दुकान थाटले. परंतु, अनिकेत पाटील यांनी ते दुकान मोडून टाकले. त्यानंतर तक्रारदाराने मोहोळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पाटीलविरुध्द गुन्हा दाखल झाला. त्यानंतर तुझ्याविरुध्द दरोड्याचा गुन्हा दाखल होईल. त्यामुळे 25 हजार रुपये देऊन भांडण मिटवून घे, असे संबंधित पोलिसांनी अनिकेत पाटील यास सांगितल्याची चर्चा आहे. दरम्यान, पाटील यास वरिष्ठाच्या परवानगीशिवाय जेलमध्ये टाकून जाणिवपूर्वक त्रास दिला. तशी तक्रार अनिकेत पाटील यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्याअनुषंगाने तपास करण्याचे आदेश डीवायएसपी प्रभाकर शिंदे यांनी शुक्रवारी (ता. 18) दिले. त्यानंतर तत्काळ चौकशी करुन शिंदे यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे चौकशी अहवाल सादर केला. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, मनोज पाटील यांची नगरला बदली झाली असून त्यांनी अद्याप पदभार सोडलेला नाही. प्रामाणिकपणाची कदर करणे आणि गैरप्रकार तथा अवैध व्यवसायाला पाठबळ देणाऱ्यांना शिक्षा करणे ही पाटील यांची खासियत राहिली आहे. 

डीवायएसपी शिंदे यांच्या अहवालानुसार निलंबीत
वरिष्ठाची परवानगी न घेता किरकोळ गुन्ह्यातील संशयित आरोपीला लॉकअपमध्ये टाकणे, त्याला जाणिवपूर्व त्रास देणे अपेक्षित नाही. डीवायएसपी प्रभाकर शिंदे यांच्या अहवालानुसार मोहोळ पोलिस ठाण्यातील दोन अधिकारी व एका पोलिस कर्मचाऱ्यास निलंबीत केले आहे. 
- मनोज पाटील, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण 


प्रभारी पोलिस निरीक्षकही रजेवर 
मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे हे रजेवर गेले असून त्यांच्याकडील पदभार आशितोष चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र, आता तेही रजेवर गेल्याची माहिती पोलिस ठाण्याकडून देण्यात आली. दरम्यान, मोहोळ पोलिस ठाण्यातील दोन अधिकारी व एक पोलिस कर्मचारी निलंबित केला आहे. त्यामुळे आता ठाण्यात पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्या खूपच कमी झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT