Accident 
सोलापूर

ब्रेकिंग ! वेळापूर येथे टिपरखाली येऊन मोटारसायकलवरील दोन ठार, एक गंभीर; संतप्त नातेवाइकांचा "रास्ता रोको' 

अशोक पवार

वेळापूर (सोलापूर) : पालखी मार्गाच्या कामावरील एस. एम. आवताडे कन्स्ट्रक्‍शन अँड कंपनीच्या टिपरखाली (एमएच 13 सीयू 9884) मोटार सायकल जाऊन झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण ठार आणि एक गंभीर जखमी झाल्याची घटना वेळापूर (ता. माळशिरस) येथे सोमवारी (ता. 30) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. 

वेळापूरच्या पूर्वेला उघडेवाडी - धानोरे रोड क्रॉसिंगवर घडलेल्या या अपघातात मोटारसायकलवरील तुषार शहाजी जाधव (वय 18) या शाळकरी युवकाचा जागीच मृत्यू झाला तर देवा बाबासाहेब माने (वय 28) याचा उपचाराला नेताना मृत्यू झाला. तर तिसरा तरुण धनंजय संजय माने (वय 17) गंभीररीत्या जखमी असून, अकलूज येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

अपघात इतका भीषण होता, की मृत तरुणाच्या मृतदेहाचे तुकडे घटनास्थळी इतस्ततः विखुरले होते. प्रत्यक्षदर्शी नातेवाइकांच्या मते, एका पोलिस कर्मचाऱ्याने मोटारसायकलवरून केलेल्या पाठलागामुळे हे अपघातग्रस्त तरुण टिपरखाली आले. संतप्त नातेवाइकांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याच्या अटकेसाठी आणि निषेधार्थ घटनास्थळी मृतदेहाभोवती कडे करून रस्ता रोखून धरला. वेळापूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांनी नातेवाइकांच्या म्हणण्याप्रमाणे कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने नातेवाइकांनी मृतदेह उचलण्यास परवानगी दिली. 

मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्यानंतर संतप्त नातेवाइकांचा जमाव वेळापूर पोलिस स्टेशनमध्ये येऊन अपघातग्रस्त तरुणांचा विना गणवेश पाठलाग करणाऱ्या पोलिस कर्मचारी विनोद साठे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रह धरून पोलिस स्टेशनच्या समोरील अकलूज - सांगोला रस्त्यावर ठिय्या धरला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अकलूज उपविभागीय अधिकारी धीरज राजगुरू यांनी वेळापूर येथे धाव घेऊन सूत्रे आपल्या हाती घेतली. वेळापूर पोलिसांकडून गुन्हे नोंद करण्याचे काम सुरू आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेवटच्या दिवशी PM मोदी आणि शहा आले, ४ मिनिटात कामकाज आटोपले; लोकसभा अनिश्चित काळासाठी तहकूब

Shaktipeeth Highway Protest : जयंत पाटील, राजू शेट्टी एकत्र! 'शक्तिपीठ' रद्द करण्यासाठी सांगलीत मोठ्या आंदोलनाची घोषणा; 31 गावांतील 3 हजार एकरांहून अधिक जमीन बाधित

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका! डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह बड्या ब्रँड्सवर FDAची धाड; 5 परवाने निलंबित

Independence Day 2026: तिरंगा थीमवर सजवा घर, शाळा अन् ऑफिस! १५ ऑगस्टला नक्की ट्राय करा 'या' भन्नाट डेकोरेशन आयडियाज!

Latest Marathi News Live Update : पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकारचे अत्यंत अहंकारी वर्तन- कॉंग्रेस

SCROLL FOR NEXT