CA Sisters
CA Sisters 
सोलापूर

सोलापूरच्या दोघा बहिणींचे सीए परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश ! एकीने 27 तर दुसरीने मिळवला 39वा रॅंक 

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या सीए परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात सोलापूरच्या दोघा सख्ख्या बहिणींनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे. अनुश्री व ऐश्‍वर्या सोनी अशी या दोघा बहिणींची नावे आहेत. 

सोलापुरातील व्यापारी कमलकिशोर सोनी यांच्या अनुश्री व ऐश्‍वर्या या दोन मुली आहेत. अनुश्रीने सीएच्या परीक्षेत ऑल इंडिया रॅंकिंग 27 (मार्क्‍स 515) आणि ऐश्‍वर्या 39 व्या रॅंकने (मार्क्‍स 496) उत्तीर्ण झाली आहे. 

अनुश्री सोनी हिने बारावी सायन्समध्ये सोलापुरात प्रथम क्रमांक पटकावला होता. त्या वेळी नीता अंबानी यांनी तिचे अभिनंदन करून तिला त्यांच्या संस्थेमार्फत इंजिनिअरिंगसाठी स्कॉलरशिप दिली होती. अनुश्रीने डब्ल्यूआयटीमधून कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग केले असून, त्यानंतर तिने सीए फायनल एक्‍झामची तयारी केली. तिला पुणे येथील व्ही स्मार्ट इन्स्टिट्यूट, संजय सराफ इन्स्टिट्यूट या संस्थेचे मार्गदर्शन लाभले. सायन्स बॅकग्राउंड असूनही सीए परीक्षेत ती अगदी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली आहे. 

तसेच ऐश्वर्या सोनी हिनेदेखील सीए परीक्षेत 39 वा रॅंक मिळवून यशस्वीपणे पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली आहे. ती आयपीसीसीमध्ये देखील फर्स्ट अटेम्प्टमध्येच क्‍लिअर झाली आहे. तसेच नुकत्याच झालेल्या सीए परीक्षेत देखील पहिल्याच प्रयत्नात एकोणचाळिसावा रॅंक मिळवून यशस्वी झाली आहे. एकाच कुटुंबातील या दोघी बहिणी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाल्यामुळे माहेश्वरी समाजबांधवांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 

मारवाडी समाजाचा बिझनेस ट्रेंड मोठा असतो. तसेच आमच्या घरच्या बिझनेसमध्ये किंवा समाजातील अनेक उद्योजक, व्यापाऱ्यांना सीएच्या माध्यमातून फायदा करून देण्याच्या विचाराने आम्हा दोघा बहिणींनी सीए केला आहे, अशी प्रतिक्रिया अनुश्री सोनी हिने "सकाळ'शी बोलताना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT