सोलापूरः लॉकडाउनमुळे विस्कळित झालेल्या बाजारपेठेने ग्रामीण भागातील भाजीपाल्यांची गरज भागावी या हेतूने शेकडो महिलांनी बचतगट व वैयक्तिक परसबाग मोहिम राबवली आहे. या मोहिमेत महिलांनी वीस दिवसामध्ये दोन हजार आठशे परसबागांची निर्मिती केली आहे. या प्रयोगातून सहभागी महिलांना अंदाजे पाच ते आठ लाख रुपयाचे उत्पन्न मिळणार आहे.
सध्या लॉकडाउनमुळे भाजीपाला बाजारपेठ शहरी भागात विस्कळित झाली आहे. तसेच आठवडा बाजार देखील बंद आहे. लॉकडाउन काळात घराबाहेर पडता येत नसल्याने गावातच भाज्यांची गरज भागावी यासाठी ही मोहिम राबवण्यात आली.
ग्रामीण भागात असलेले बचतगटाच्या माध्यमातून महिलांना परसबागाची निर्मिती करण्यासाठी माहिती देण्यात आली. तसेच अनेक महिलांना त्यांच्या वैयक्तिक परसबागा करण्यास प्रोत्साहन देण्यात आले. या वर्षी वेळेवर पडलेला पाऊस व लॉकाडाउनमुळे असलेला रिकामा वेळ या दोन्ही गोष्टी मोहिमेसाठी उपयुक्त ठरल्या. गावातील मोकळ्या जागा, शेतजमिनीमध्ये परसबागासाठी निवडल्या गेल्या. स्थानिक पातळीवर महिलांनी भाजीपाल्याच्या बियांची देवाणघेवाण केली.
या मोहिमेत दोन हजार 200 परसबागा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. मात्र मोहिम सुरु होताचा महिलांच्या मोठ्या प्रतिसादामुळे जिल्ह्यात तब्बल 2 हजार 800 परसबागा तयार झाल्या आहेत. अजुनही काही गावात परसबागा करण्याचे काम सुरू आहे. या मध्ये सर्व प्रकारच्या पालावर्गीय व फळवर्गीय भाज्यांचा समावेश आहे. हे भाजीपाला उत्पादन सेंद्रिय पध्दतीने घेण्यात आले आहे. महिलांना त्यांच्या कुटुंबाचे पोषणासाठी व विक्रीतून उत्पन्न मिळवण्याची सोय झाली आहे. या मोहिमेत महिला स्वयंसहायता समुहाचे पदाधिकारी, कृषीसखी व सीटीसी समन्वयकांनी परसबाग करणाऱ्या महिलांना मदत केली. अभियान व्यवस्थापक मिनाक्षी मडवले व पोषण सल्लागार प्रशांत सातपुते यांच्यासह ग्रामीण भागातील उमेदच्या विविध समन्वयकांनी मोहिमेसाठी पुढाकार घेतला. उमेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी देखील या सोलापूर जिल्ह्याच्या कामगिरीबद्दल कौतुक केले आहे.
कुटुंबासाठी पोषण गरजा भागतील
कृती संगमच्या माध्यमातून गावामध्ये परसबागांची निर्मिती करण्यात आली. या उत्पादनामुळे महिलांना त्यांच्या कुटुंबाच्या पोषणासाठी सेंद्रिय भाजीपाला उपलब्ध होणार आहे.
- अपर्णा ज्ञानेश्वर देशमूख, कृतीसंगम सीटीसी समन्वयक, दारफळ, ता.माढा.
विक्रीतून मिळेल उत्पन्न
लॉकडाउनच्या काळात परसबागा केल्याने या भाजीपाल्यांचा उपयोग कुटुंबासाठी होईल. तसेच इतर भाज्यांची विक्री करून चांगले उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.
- शोभा दिगंबर कदम, संजीवनी महिला स्वयंसहायता समुह, टेंभुर्णी, ता.माढा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.