motor.jpg sakal
सोलापूर

दुचाकी चोरांचे पोलिसांनाच आव्हान! १ जानेवारी ते ७ जूनपर्यंत १२६ दुचाकींची चोरी

जानेवारी ते ७ जून २०२२ या पाच महिन्यांतच चोरट्यांनी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून तब्बल १२६ दुचाकी चोरून नेल्या आहेत. पोलिसांनी काही चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून दुचाकी जप्त केल्या. त्यावेळी यापुढे चोरी होणार नाही, असा विश्वास पोलिसांना वाटला. पण, दुचाकी चोरीचा सिलसिला सुरूच आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : शहरात दुचाकी चोरट्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे. जानेवारी ते ७ जून २०२२ या पाच महिन्यांतच चोरट्यांनी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून तब्बल १२६ दुचाकी चोरून नेल्या आहेत. पोलिसांनी काही चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून दुचाकी जप्त केल्या. त्यावेळी यापुढे चोरी होणार नाही, असा विश्वास पोलिसांना वाटला. पण, दुचाकी चोरीचा सिलसिला सुरूच आहे.

सोलापूर शहरात कामगार वर्ग मोठा असून त्यात हातावरील पोट असलेल्यांची संख्या अधिक आहे. ग्रामीण भागातून शेतकरी शेतमाल विकायला कृषी उत्पन्न बाजार समितीत येतात. त्यांच्याही दुचाकी चोरट्यांनी सोडल्या नाहीत. दुचाकीस्वारांनी दुचाकी हॅंडल लॉक केल्यानंतरही चोरटे लॉक तोडून दुचाकी चोरून नेत आहेत, हे विशेष. पोटाला चिमटा घेऊन पै-पै जमवून अनेकांनी दुचाकी घेतली. आयुष्यात पहिल्यांदा घेतलेल्या स्वप्नातील दुचाकीची अनेकांनी जोपासना केली. पण, चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. पोलिसांच्या गस्तीमुळे चोरी होणार नाही, हा विश्वास मनात ठेवून अनेकजण कार्यालयाबाहेर किंवा बाजार, कार्यक्रमाच्या ठिकाणी, मंगल कार्यालयांसमोर दुचाकी लावून जातात. मात्र, चोरटे अलगदपणे दुचाकी चोरून नेऊ लागले आहेत. अनेकांना पोलिसांनी पकडले आणि त्यांच्याकडून दुचाकी जप्त केल्या; तरीही दुचाकी चोरी अद्याप थांबलेली नाही. दुचाकी चोरी व घरफोडी रोखण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. नवीन पोलिस आयुक्त त्यावर काय ठोस उपाय काढतील, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

महिनानिहाय दुचाकी चोरी
जानेवारी : २८
फेब्रुवारी : २१
मार्च : २३
एप्रिल : २५
मे : २४
जून : ५

हॅंडल लॉक तोडून चोरी
आतापर्यंत फौजदार चावडी, जेलरोड, जोडभावी पेठ, सदर बझार या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक दुचाकी चोरीची नोंद झाली आहे. शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने अनेकजण घराबाहेर किंवा इतर ठिकाणी दुचाकी लावताना आवर्जून हॅंडल लॉक करतात. तरीदेखील चोरटे हॅंडल लॉक तोडून दुचाकी चोरून नेत आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतूनही अनेक शेतकऱ्यांच्या दुचाकी चोरीला गेल्याने त्यांच्यावर पोलिस ठाण्याची पायरी चढण्याची वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डिझेलचा भडका, एसटीच्या तिकीट दराचे काय? परिवहन मंत्री म्हणाले, महामंडळाला तोटा होतोय, सध्या...

Ambenali Accident: आंबेनळी ठरतोय मृत्यूचा घाट, ८ वर्षांपूर्वी झालेला ३३ जणांचा मृत्यू; गेल्या तीन महिन्यात तिसरी दुर्घटना

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Latest Marathi News Live Update : अर्जुन खोतकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

Blackmail case: महिलेसोबतच्या व्हिडीओवरून ब्लॅकमेल, बँक कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल; ६ जणांवर गुन्हा, चौघांना अटक

SCROLL FOR NEXT