मरवडे येथे विषबाधेने दोन सख्ख्या चिमुकल्या बहिणींचा मृत्यू!  sakal
सोलापूर

मरवडे येथे विषबाधेने दोन सख्ख्या चिमुकल्या बहिणींचा मृत्यू!

मरवडे येथे विषबाधेने दोन सख्ख्या चिमुकल्या बहिणींचा मृत्यू!

श्रीकांत मेलगे

मरवडे (ता. मंगळवेढा) येथे अन्नातून झालेल्या अज्ञात विषबाधेमुळे दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मरवडे (सोलापूर) : मरवडे (ता. मंगळवेढा) (Mangalwedha) येथे अन्नातून झालेल्या अज्ञात विषबाधेमुळे (Poisoning)) दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भक्ती आबासाहेब चव्हाण (वय 06) व नम्रता आबासाहेब चव्हाण (वय 04) या दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याने मरवडे गावावर शोककळा पसरली आहे. (Two young girls passed away due to sweets poisoning in Marwade)

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मरवडे येथील आबासाहेब चव्हाण यांनी आपल्या भक्ती व नम्रता या लाडक्‍या लेकींसाठी मंगळवारी (ता. 21) मंगळवेढा येथील दुकानातून खाऊ आणला होता. हा खाऊ खाल्ल्यानंतर चव्हाण कुटुंबातील सर्वांनाच अस्वस्थ वाटू लागल्याने ते मंगळवेढा व पंढरपूर (Pandharpur) येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाले. उपचारादरम्यान गुरुवारी (ता. 23) पहाटे आबासाहेब चव्हाण यांची मोठी मुलगी भक्ती हिचा मृत्यू मंगळवेढा येथील खासगी दवाखान्यात झाला तर दुसरी मुलगी नम्रता हिचा मृत्यू गुरुवारी (ता. 23) मध्यरात्री पंढरपूर येथील खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान झाला.

भक्ती ही मरवडे येथील प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीत शिकत होती तर नम्रता ही बालवाडीत शिकत होती. भक्ती व नम्रता यांच्या गोड स्वभाव व हुशारीमुळे त्या सर्वांच्यात लाडक्‍या होत्या. भक्ती व नम्रता यांच्यावर मरवडे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच कुटुंबातील दोघी बहिणींचा अन्नातील विषबाधेने मृत्यू झाल्याने मरवडेत खळबळ उडाली असून, या घटनेबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. मृत मुलींचे वडील आबासाहेब व आई सुषमा यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत. या घटनेचा मंगळवेढा पोलिस (Mangalwedha Police) ठाण्याकडून तपास केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : राज्यात वादळी पावसाचा इशारा; आज 'या' जिल्ह्यांत गारपीट होण्याची शक्यता

Gadchiroli News: रेकाॅर्डवरील शेवटच्या माओवाद्याला परतीची साद; लोकशाही मार्ग स्वीकारण्याचे आवाहन; डाव्या पक्षांच्या नेत्यांनी घेतली कुटुंबाची भेट

Donald Trump Speech: आता तुम्ही तुमचं बघा... ट्रम्पने केले हात वर, होर्मुझवरुन इतर देशांना दिला सल्ला! तेलाचा प्रश्न पेटणार

Kolhapur fire news : कोल्हापुरातील फुलेवाडी रिंगरोडवरील सुपर बाजारला भीषण आग; मोठे नुकसान

Akola News: दहा हजार रुपये देतो, तुझी मुलगी पाठव; लॉकअपमधील महिला आरोपीला मागणी, एएसआय निलंबीत

SCROLL FOR NEXT