ujani dam flamingo birds arrive on time this year dr arvind kumbhar solapur esakal
सोलापूर

Solapur News : उजनीवर यंदा फ्लेमिंगोचे वेळेवर आगमन!

डॉ. अरविंद कुंभार : पाणीसाठा कमी अन्‌ पक्ष्यांसाठी मुबलक खाद्य उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा

पारेवाडी : यंदाच्या पाऊसमानाचा परिणाम पक्ष्यांच्या जीवनावर होण्याची शक्यता असल्याचे मत जिल्ह्यातील पक्षी निरीक्षकांनी व्यक्त करत असतानाच, या वर्षी अगदी ठरलेल्या वेळेतच उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर परदेशी पाहुणे फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्ष्यांचे आगमन झाल्याची माहिती ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी दिली.

यावर्षीच्या पावसाळ्यातील बहुतांश नक्षत्रे कोरडे गेल्यामुळे जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. त्यामुळे विविध प्रजातींच्या विदेशी पक्ष्यांनी आपल्या नेहमीच्या वेळी उजनी जलाशयावर हजेरी लावली आहे.

साधारणपणे पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्यात विदेशी पक्षी सोलापूर जिल्ह्यातील उजनीसह विविध ठिकाणी येत असतात; मात्र गेली काही वर्षे अस्थिर हवामानामुळे त्यांच्या आगमनाचे वेळापत्रक बदलत राहिले होते. या‌ वर्षी मात्र हे पक्षी ठरलेल्या वेळेनुसार येऊन दाखल झाले आहेत.

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर स्थलांतरित पक्षी हिवाळी पाहुणे पहिल्या टप्प्यात फ्लेमिंगोसह तुतुवार, नदी सुरय, समुद्र पक्षी (गल पक्षी), मत्सयगरुड, विविध धोबी पक्षी आणि नाना तऱ्हेची बदके गेल्या काही दिवसांत येऊन दाखल झाली आहेत.

उजनीवर विविध पक्ष्यांची मांदियाळी

नेहमी डिसेंबर व जानेवारी महिन्यात येणारे रोहित (फ्लेमिंगो) पक्षी या वर्षी अपेक्षेपेक्षा लवकर येऊन दाखल झाले आहेत. उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रावर सुमारे दोनशेच्या संख्येने रोहित पक्षी दिवसभर विहार करताना पक्षी व पर्यावरणप्रेमींना भुरळ घालत आहेत.

पट्टकदंब (बार हेडेड गूज), चक्रवाक (ब्राह्मणी डक), चिखल बाड्डा (गार्गेनी), श्वेतबलाक (व्हाईट स्टॉर्क), मत्स्यघार (ऑस्प्रे), समुद्रपक्षी (सी गल), नदी सुरय (रिव्हर टर्न), विविध प्रकारच्या धोबी (वॅगटेल) आदी स्थलांतरित पक्षी हजारो किलोमीटर अंतर पार करून हिवाळी पाहुणे म्हणून येथे दाखल झाले आहेत.

स्थलांतर पक्षी कोठून येतात?

स्थलांतरित पक्षी तिबेट, रशिया, सायबेरिया, मंगोलिया, युरोप, कझाकस्तान, दक्षिण अमेरिका, आर्क्टिक महासागर येथून निघून हिमालय पर्वत ओलांडून भारतात येतात व विविध पाणथळांवर हजेरी लावतात.

या वर्षी पाऊसमान चांगला झाला नसल्यामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही; शिवाय जिल्ह्यातील बहुतांश पाणवठे कोरडे पडले आहेत. उन्हाळ्यात धरण परिसर कोरडे पडणार व पक्ष्यांना खाद्य उपलब्ध होणार नाही, या अंदाजाने स्थलांतरित पक्ष्यांनी धरण परिसरात गर्दी केली आहे.

- डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक, सोलापूर

उजनीचे आकर्षण असलेले फ्लेमिंगो पक्षी यावर्षी अपेक्षेपेक्षा लवकर येऊन दाखल झाल्यामुळे उजनी परिसर बहरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील पक्षीप्रेमी उजनीवर गर्दी करत आहेत.

- कल्याणराव साळुंखे, पक्षी निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat News: ताम्हिणी घाटात प्रचंड वाहतूक कोंडी! पुणे-कोकण मार्ग बंद करण्याचा निर्णय, वाहनांच्या लांबच लांब रांगा

IND vs SA, 2nd Test: शुभमन गिल खेळला नाही, तर रिषभ पंतच्या नावावर होणार मोठा विक्रम! धोनीनंतर पहिल्यांदाच...

Solapur Election : अर्ज छाननीत पाच तासांचा थरार; कोंडूभैरी आणि कदम यांच्या भूमिकेवर नगराध्यक्ष निवडीचे समीकरण अवलंबून!

Kolhapur News: महायुतीतील मित्रपक्षांत धुसफूस, ‘इनकमिंग’वरून नाराजी; जागा वाटप फॉर्म्युला अनिश्चित

Umarga News : महायुती व महाविकास आघाडीचे आज चित्र स्पष्ट होणार; उमरगा व मुरुम पालिकेतील तडजोडीकडे सर्वांचे लक्ष!

SCROLL FOR NEXT