सोलापूर

उजनी धरण मेच्या दुसऱ्या पंधरवाड्यात वजा १० टक्क्यावर

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः उजनी धरण मे महिन्यात दुसऱ्या पंधरवड्यात वजामध्ये आले आहे. आज सकाळी सहा वाजता धरणात वजा 10 टक्के इतका पाणीसाठा होता. त्याचबरोबर सध्या कालवा व बोगद्याच्या माध्यमातून शेतीसाठी पाणीपुरवठा सुरु आहे. पण, या दोन्ही ठिकाणहून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी करण्यात आला आहे. 
जिल्ह्याची वरदायिनी म्हणून उजनी धरणाकडे पाहिले जाते. यंदा मे महिन्यात सोडलेले पाणी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरले आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये हे पाणी मिळाल्याने ऊस या प्रमुख पिकासाठी ते फायदेशीर ठरले आहे. याशिवाय काही फळबागांचे क्षेत्र त्यामुळे वाचण्यास मदत झाली आहे. येत्या महिना अखेरपर्यंत धरणातून कालवा व बोगद्यातून पाणी सोडणे सुरु राहण्याची शक्‍यता आहे. 

दक्षिणमधील शेतकऱ्यांची पाणी सोडण्याची मागणी 
दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील काही शेतकऱ्यांनी टेल टे हेड या पद्धतीने पाणी सोडण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत शेवटी पाणी पोचले जात नाही तोपर्यंत कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी कमी करण्यात येऊ नये, अशी मागणीही त्या शेतकऱ्यांनी केली आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sydney Beach Shooting : किंकाळ्या अन् जीव वाचवण्याची धडपड! सिडनीतील गोळीबाराचा थरकाप उडवणारा VIDEO समोर...

"मी त्यांना सांगितलं बारा तासांच्या वर.." कामाच्या वेळेबाबत जेव्हा मयुरीने घेतला ठाम निर्णय, म्हणाली..

Dhurandhar Video : 'धुरंधर' 300 कोटी पार! पण रहमान डकैतच्या रोलमध्ये शाहरुख खान असता तर...व्हायरल AI व्हिडिओ पाहून चाहते शॉक

Latest Marathi News Live Update: सोलापुरच्या बेडर पूल-नानीपार्क रस्त्याची भयानक दुरावस्था

Mumbai News: जळीत रुग्णांसाठी केईएमचा मोठा आरोग्यविषयक टप्पा! नवीन उपचार केंद्राचे लोकार्पण; काय सुविधा मिळणार?

SCROLL FOR NEXT