Solapur-Municipal.jpg 
सोलापूर

कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावरील प्रभाग 

तात्या लांडगे

धडपड कोरोनामुक्‍तीची : प्रभाग एक 
सोलापूर : पुणे, कोल्हापूर, सातारा, उस्मानाबाद, नगर या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रवेश झाल्यानंतरही सोलापूर कोरोनापासून दूर होते. मात्र, 14 एप्रिलला शहरात पहिला रुग्ण सापडला आणि तिथून कोरोनाचा कहर सुरू झाला. शहरातील रुग्णसंख्या आता दहा हजारांकडे वाटचाल करीत आहे. परंतु, नागरिकांच्या प्रयत्नातून शहरातील प्रभाग क्रमांक एकमधील 283 रुग्णांपैकी 255 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर प्रभागातील ऍक्‍टिव्ह रुग्णसंख्या आता चार असून नागरिकांच्या प्रयत्नातून हा प्रभाग आता कारोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर आहे. 

शहरात 15 नागरी आरोग्य केंद्रे असून आठ झोन (विभागीय) कार्यालये आहेत. आतापर्यंत (26 ऑक्‍टोबर) शहरातील नऊ हजार 425 व्यक्‍तींना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 526 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर शहरात आता ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या 433 वर आली आहे. शहरातील शेळगी, नई जिंदगी, रामवाडी, जिजामाता, देगाव, विडी घरकूल, मजरेवाडी, जोडभावी पेठ, भावनाऋषी, बाळे, मधुरा सनसिटी, साबळे हॉस्पिटल, सोरेगाव, दाराशा व आउट ऑफ सिटी सिव्हिल या 15 नागरी आरोग्य केंद्रांपैकी रामवाडी केंद्र परिसरात सर्वाधिक एक हजार 348 रुग्ण आढळले आहेत. तर त्यातील एक हजार 221 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 62 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण प्रभागांमध्ये प्रभाग एक हा रुग्णसंख्येत अकराव्या क्रमांकावर असून मृत्यूच्या संख्येत सहाव्या क्रमांकावर आहे. 

नागरिकांनी विनाकारण घराबाहरे जाणे टाळले 
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर प्रभाग एकमधील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर जाणे टाळले. दुसरीकडे मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करीत प्रशासनाच्या नियमांचे पालन केले. त्यामुळे आता हा प्रभाग कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. या प्रभागात रवी गायकवाड, राजश्री कणके, निर्मला तांबे आणि अविनाश पाटील हे नगरसेवक आहेत. त्यांनीही नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे सातत्याने आवाहन केले. नागरिकांनी कोरोनाला हद्दपार करण्याचा संकल्प केल्याने आता हा प्रभाग कोरोनामुक्‍त होईल, असा विश्‍वास आहे. 

प्रभाग एकसंबंधी ठळक बाबी... 

  • - आतापर्यंत एक नंबर प्रभागात आढळले 283 कोरोना पॉझिटिव्ह 
  • - एकूण रुग्णांमधील 255 रुग्णांनी केली कोरोनावर मात 
  • - प्रभाग एकमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 24 रुग्णांचा झाला मृत्यू 
  • - अन्य प्रभागांच्या तुलनेत हा प्रभाग मृत्यू संख्येत सहावा तर रुग्णसंख्येत अकराव्या क्रमांकावर 

संपादन : अरविंद मोटे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT