Dayama Family
Dayama Family 
सोलापूर

अनाथ मुस्लिम अवलियाचा मारवाडी कुटुंबाशी लळा ! मृत्यूनंतर केला मुस्लिम धर्माप्रमाणे दफनविधी

दावल इनामदार

ब्रह्मपुरी (सोलापूर) : भारतीय संस्कृतीत जात, धर्म, माणुसकी आदी गोष्टी आजही जपल्या जात आहेत. कुटुंबात अनेक माणसं कलह करून वाटेल ते करतात. अगदी नातीगोतीही तोडतात. अशांमध्ये आपण प्रामाणिकपणा विसरून गेलो. मात्र प्रामाणिकपणा, जिव्हाळा आणि विश्वास आजही जिवंत असल्याचे दिसून आलं. मंगळवेढा शहरातील मुस्लिम अवलियाने मारवाडी समाजातील दायमा कुटुंबाशी लळा लावत "हम सब एक है' अशी भारतीय संस्कृती जपल्याची आठवण करून दिली. 

जातिधर्मांना फाटा देत अजूनही हिंदू- मुस्लिम भाईचारा जपल्याचे जिवंत मूर्तिमंद उदाहरण म्हणजे मंगळवेढ्यातील पैगंबर सुतार होय. पैगंबर या नावानेच असल्याने मुस्लिम धर्मातील प्रेषिताने केलेले आचरण व भाईचारा जपल्याचे पालन आजही केले जात आहे. 

मंगळवेढा शहरातील दायमा कुटुंबीयांनी एका मुस्लिम समाजातील व्यक्तीस लहानपणापासून कुटुंबातील सदस्य समजून त्याचे पालनपोषण करून वाढविण्याचे काम केले. समाजापुढे "हम सब भाई-भाई है' हा आदर्श दाखवून दिला आहे. 

दायमा कुटुंबीयांचा संपर्क पैगंबर कोंडाजी सुतार यांच्या वयाच्या बाराव्या वर्षी आला. तेव्हापासून ते वयाच्या 73 व्या वर्षापर्यंत म्हणजेच 61 वर्षे ते नथमल रघुनाथ दायमा यांच्या कुटुंबीयांत एक सदस्य म्हणून राहात होते. दायमा कुटुंबीयांनीही त्यांना घरातील सदस्याप्रमाणे माया, प्रेम देऊन त्यांचे पालनपोषण केले. आजारी पडल्यास त्यांना दवाखान्यात नेणे, त्यांच्यावर उपचार, देखभाल करणे आदी कर्तव्येही दायमा कुटुंबीयांनी पार पाडली. त्याचबरोबर या कालावधीत त्यांच्या कुटुंबीयांसमवेत चारो धाम यात्राद्वारे देवदर्शनही घडवून आणले. दायमा कुटुंबीयांतील एक विश्वासू म्हणून पैगंबर यांची ओळख होती. 

हा गृहस्थही दायमा कुटुंबीशांची एकरूप झाला होता. वाढदिवस असो किंवा दिवाळी, दसरा या सणामध्ये त्यांना सामावून घेऊन सर्व सण एकत्र कुटुंबात साजरे केले जात होते. दायमा कुटुंबीय स्वतःच्या पंक्तीला घेऊन त्यांना जेवू घालत असत. दायमा कुटुंबातील पाच भावांसह त्यांना सहावा भाऊ असे मानत होते. वयाच्या लहानपणापासून कुटुंबाचा सदस्य असल्यासारखे राहिले व मारवाडी समाजाशी नाळ घट्ट झाली. 

पैगंबर हे मारवाडी समाजातील गल्लीतच राहात असल्यामुळे मारवाडी भाषेचे त्यांना ज्ञान होते. दायमा कुटुंबातील सर्व पाहुण्यांच्या घरी येणे- जाणे होत असत व प्रत्येक सुख- दुःखातही सामील होत होते. त्यांनी केलेल्या कुटुंबातील समाजाशी एकोपा, कामाचा विश्वास, प्रामाणिकपणा आजही जाणवत आहे. 

त्यांच्या अकाली निधनाने दायमा कुटुंबासोबतच मारवाडी समाजही हळहळ व्यक्त करीत आहे. 61 वर्षे वाढलेल्या दायमा कुटुंबातील पैगंबर यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर दायमा कुटुंबीय दुःखाच्या डोहात बुडून गेले. मुस्लिम धर्माप्रमाणे त्यांच्यावर या कुटुंबाने दफनविधीही केला. गोडाच्या दिवशी व वर्षश्राद्धाला स्व. पैगंबर यांच्या नावाने पंढरपूर येथील अनाथाश्रमात अन्नदान यापुढे नित्यनियमाने केले जाणार असल्याचे व त्यांच्या निधनाने आमच्या कुटुंबाला आयुष्यभर आठवणी कायमच्या स्मरणात राहतील, असे दायमा कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SCROLL FOR NEXT