dr metan chamu new.jpg 
सोलापूर

भारताच्या किनारपट्टीवर अनोख्या प्रवासाची मोहिम : डाॅ.मेतन फाउंडेशनचा उपक्रम

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः डॉ. मेतन फाउंडेशनने संपूर्ण भारतीय किनारपट्टीवरील रस्त्यावरून कारने एक अनोखा प्रवास करण्याची मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेत सहभागी सोलापूरचे अस्थीरोग तज्ञ व पक्षी निरीक्षक डॉ. व्यंकटेश मेतन, उपेंद्रकुमार महाराणा, डॉ. विजयकुमार गोदेपुरे आणि वैभव होमकर हे चौघे आज सोलापूर शहरातून रवाना झाले. "निसर्ग वाचवा" आणि भारतीय अविश्वसनीय संस्कृती आणि परंपरा यांचे अन्वेषण करणे हा मोहिमेचा उद्देश ठेवण्यात आला आहे. 

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ड्रायव्हिंग करण्याची आवड असलेल्या लोकांसाठी किनारपट्टी एक लोकप्रिय रोड ट्रॅक म्हणून बनावा या साठी मोहिमेद्वारे प्रयत्न होतील. मोहिमेत सहभागी चमू सुरवातीला गेट वे ऑफ इंडिया येथे जाईल. तेथून भारतीय पश्‍चिम किनारपट्टीवरून दीव दमण - खंबाट - द्वारका मार्गे गुजरातमधील लखपत बीच येथे पोहोचेल. तेथून उदयपूर व कानपूरमार्गे पश्‍चिम बंगाल येथील बखाली बीच येथे जाणार आहे. तेथून भारताची पूर्व, दक्षिण आणि पश्‍चिम किनारपट्टीवरून गेट वे ऑफ इंडिया येथे परत येतील. हा प्रवास करताना भारतातील नऊ किनारी राज्ये, चार केंद्रशासित प्रदेश आणि पश्‍चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेस हिंद महासागराला भेट देत 7500 किमी अंतर पार करणार आहेत. या मोहिमेत समुद्र किनारपट्टीवरील जन- जीवनाचा, संस्कृतीचा आणि पर्यटनाचा अभ्यास केला जाईल. या अनोख्या प्रवासाला खासदार, आमदार आदी लोकप्रतिनिधीसह सोलापूर वनविभाग, सामाजिक वनीकरण, स्मार्ट सिटी अधिकारी आदींनी मोहिमेस शुभेच्छा दिल्या.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

Latest Marathi News Updates: शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी उज्ज्वल निकम यांचे केले अभिनंदन

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

SCROLL FOR NEXT