3exam_20student_20new.jpg 
सोलापूर

विद्यापीठाच्या 13 जानेवारीपासून परीक्षा ! विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईनचा पर्याय नाहीच

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची आगामी परीक्षा ऑनलाइनच घेतली जाणार आहे. अंभियांत्रिकीला थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेणारे विद्यार्थी वगळता सर्वच अभ्यासक्रमाचे द्वितीय व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 13 जानेवारीपासून सुरु करण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे.

विद्यार्थी केंद्रबिंदू मानून परीक्षेचे नियोजन
कोरोनामुळे अंतिम विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन पार पडली. 99.86 टक्‍के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली. विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे उत्तम नियोजन करण्यात आले होते. आता आगामी परीक्षांचेही नियोजन उत्तमप्रकारे केले असून लवकरच वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाईटवर अपलोड केले जाईल.
-श्रेणिक शहा, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मागील परीक्षा ऑनलाइन पार पडली. त्यात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील 99.86 टक्‍के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली. सुमारे 70 हजारांपैकी 136 विद्यार्थ्यांनीच ऑफलाइन परीक्षा दिली. हा अनुभव पाहता विद्यापीठाने आगामी परीक्षा ऑनलाइन घेण्याचे नियोजन केले आहे. प्रत्येक पेपर सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना दीड तासाचा वेळ दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसंबंधी अडचणी असल्यास त्यांची 'मॉक टेस्ट' घेण्याचीही तयारी विद्यापीठाने ठेवली आहे. जेणेकरुन सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षा देणे सोयीस्कर होईल, हा उद्देश आहे. दरम्यान, जानेवारीत होणाऱ्या परीक्षेसाठी ऑफलाइन हा पर्याय ठेवण्यात आलेला नाही. द्वितीय व अंतिम वर्षासाठी सोलापूर विद्यापीठाअंतर्गत 50 ते 54 हजार विद्यार्थी जानेवारीत परीक्षा देणार आहेत. परीक्षेचे वेळापत्रक निश्‍चित झाले असून ते विद्यार्थ्यांपर्यंत परीक्षेच्या आठ-दहा दिवसअगोदर पोहचविले जाणार आहे.


दोन सत्रात परीक्षेचे नियोजन
पारंपारिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा स्वतंत्रपणे नव्हे, तर एकाचवेळी घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. ऑनलाइन पध्दतीने परीक्षा होणार असल्याने सकाळ आणि दुपार, अशा दोन सत्रात परीक्षा घेण्याचे नियोजन पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने केले आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, अशी व्यवस्था केल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT