pollution.jpg 
सोलापूर

अनलाॅकमध्ये वाहन वर्दळीच्या प्रदूषणाची होतेय तपासणी

सकाळ वृत्तसेवा

सोलापूरः मागील दोन महिन्यांच्या लॉकडाउनच्या काळात शहरात थांबलेल्या वाहनांच्या वर्दळीने वायू प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. त्यानंतर आता अनलॉकमध्ये वाहनांची वर्दळ वाढली आहे. या बदलत्या स्थितीत प्रदूषण पातळीत झालेले बदल तपासले जात आहेत. 

मागील दोन महिन्यांपासून लॉकडाउनमध्ये वायू प्रदूषणाचे आकडे मोठ्या प्रमाणात कमी झालेले होते. यामध्ये हवेत असलेले धुलीकणाचे प्रमाण, वाहनाच्या धुरामधून बाहेर पडणारे वायू या दोन्हींच्या बाबतीत आकडेवारी कमी झाली होती. दोन महिन्यांच्या कालावधीत नागरिक वाहन घेऊन घराबाहेर पडण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते. जे नागरिक वाहने घेऊन बाहेर पडले त्यांच्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. तीन हजार वाहने संपूर्ण कालावधीत पोलिसांनी ताब्यात घेत दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे वाहनाच्या वापराला बऱ्यापैकी आळा बसला होता. 

या आठवड्यापासून शासनाने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे वाहने वापरण्यास नागरिकांना आता परवानगी मिळाली आहे. मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ वाढली आहे. बाजारपेठा सुरू झाल्याने वाहने घेऊन बाजारात येणाऱ्या वाहनचालकांची संख्या वाढली आहे. त्यासोबत आता पूर्वीप्रमाणेच पुन्हा एकदा शहराला वायू प्रदूषणाला तोंड द्यावे लागणार आहे. वाहनांच्या धुरातून बाहेर पडणाऱ्या विषारी वायूचा त्यामध्ये सर्वात मोठा समावेश आहे. तसेच कच्च्या रस्त्यांच्या भागात देखील धुळीचे प्रदूषण होते. याबाबत प्रदूषण नियंत्रण खात्याकडून प्रदूषणाच्या बदलत्या स्थितीची तपासणीचे काम सुरू झाले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''मी पक्षप्रमुख पदाचा राजीनामा द्यायला तयार, पण... ''; उद्धव ठाकरेंनी घातली मोठी अट, काय म्हणाले?

Eknath Shinde: ''ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है..'', एकनाथ शिंदेंचं मोठं विधान; पक्षात येणाऱ्यांबद्दल थेटच बोलले

४८ तास महत्त्वाचे! महाराष्ट्रासह १९ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट

Pune News : खताचा काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्‍हे दाखल; १०७ परवाने निलंबित; ७ गुन्हे दाखल, कृषी विभागाची कारवाई

Lohara News : आष्टा कासार येथील घोटाळ्याप्रकरणी अधिकाऱ्यांची झाडझडती; ​३० जूनपर्यंत चौकशी पूर्ण करण्याचे अर्चनाताई पाटील यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT