unseasonal rain agriculture loss sakal
सोलापूर

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील १३४८ हेक्टरला अवकाळीचा तडाखा

सोलापूर जिल्ह्यात अवकाळीच्या तडाखाने द्राक्ष, आंबा, कलिंगड, खरबूज या फळपिकांना फटका बसत आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - जिल्ह्यात अवकाळीच्या तडाखाने द्राक्ष, आंबा, कलिंगड, खरबूज या फळपिकांना फटका बसत आहे. आतापर्यंत झालेल्या अवकाळी पावसात जिल्ह्यातील १ हजार ३४८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असल्याची माहिती कृषी विभागाच्या नुकसान पाहणीत समोर आली आहे. नुकसानीची अंतिम आकडेवारी सोमवारपर्यंत (ता. १५) येण्याची शक्यता आहे.

अवकाळी पावसाचा सर्वाधिक तडाखा पंढरपूर तालुक्याला बसला आहे. या तालुक्यातील १ हजार १५६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्या खालोखाल माढा तालुक्यातील ११९ हेक्टरचे नुकसान झाले आहे. मोहोळ तालुक्यातील ४ हेक्टर, करमाळा तालुक्यातील २० हेक्टर, माळशिरस तालुक्यातील ३८ हेक्टर व मंगळवेढा तालुक्यातील १० हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका बसल्याचे कृषी विभागाच्या नगर अंदाज पाहणीत समोर आले आहे.

सोलापूर शहरात आल्हाददायक वातावरण

शहर व जिल्ह्यात अवकाळी पाऊस आता रोजच हजेरी लावू लागला आहे. आजही सोलापूर शहर व परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पाऊस हजेरी लावण्यापूर्वी शहर व परिसराचे तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. मात्र अवकाळीने शहरातील वातावरण आल्हाददायक झाले आहे.

शहरवासीयांना कडाक्याच्या उन्हापासून दिलासा मिळाला आहे. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यानंतर आता सोलापूरच्या तापमानाचा पारा ३५ ते ३६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आला आहे. पुढील काही दिवस सोलापूर शहर व परिसरात अवकाळी पाऊस हजेरी लावेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT