akshay wale sakal
सोलापूर

UPSC Exam Result : अक्षय वाले पहिल्याच प्रयत्नात झाला वन अधिकारी

वडिलांची प्रेरणा घेऊन 'यूपीएससी' ही परीक्षा उत्तीर्ण होऊन पहिल्याच प्रयत्नात 'भारतीय वन सेवा- वर्ग एक' या विभागात देशात 100 व्या रँक ने उत्तीर्ण झाला.

राजकुमार शहा

मोहोळ - स्वतःची दोन एकर शेती तिला ही पाणी नाही, त्यामुळे कोरडवाहूच. मात्र हिम्मत न हरता ती शेती हंगामी पिकवीत व शिक्षणाचे महत्त्व जाणून घेऊन यावली, ता. मोहोळ येथील शेतकरी पोपट वाले यांनी आपल्या मुलाला शिक्षणाचे बाळकडू दिले.

मुलानेही वडिलांची प्रेरणा घेऊन 'यूपीएससी' ही परीक्षा उत्तीर्ण होऊन पहिल्याच प्रयत्नात 'भारतीय वन सेवा- वर्ग एक' या विभागात देशात 100 व्या रँक ने उत्तीर्ण झाला. या यशामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

पोपट वाले हे यावली येथील रहिवासी आहेत. त्यांना फक्त दोन एकर शेती आहे. तिला ही पाणी नाही. घरची परिस्थिती बेताचीच. परंतु त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजले होते. अशा अडचणीच्या परिस्थिती वर ही त्यांनी मात करून मुलाला शिकविले.

अक्षय याचे सहावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण मोहोळ येथील नागनाथ विद्यालय व नेताजी प्रशालेत झाले. आठवीत असताना त्याने एन एम एम एस परीक्षेत जिल्ह्यात दहावा क्रमांक पटकावला होता. तर वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन त्याने 60 ते 70 विविध बक्षीसांची कमाई केली आहे. उच्च शिक्षणासाठी तो पुणे येथे गेला. तेथील शेतकी महाविद्यालयातून बीएससी ऍग्री ही कृषी विभागाची पदवी संपादन केली.

दरम्यान 2023 मध्ये वनसेवे ची जाहिरात आली होती. पुण्यात राहून अक्षय याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. अभ्यास करून परीक्षा दिली. ता. 8 मे रोजी सदर परीक्षेचा निकाल लागला. त्यात अक्षय पहिल्याच प्रयत्नात देशात 100 व्या रँक ने उत्तीर्ण झाला.

या यशाबद्दल अक्षय वाले याचे नागनाथ व नेताजी प्रशालेतील सर्व शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुहेरी हत्याकांडानं यवतमाळ हादरलं! जगत मंदिर परिसरात रक्तरंजित थरार नेमका कसा घडला?

Murlidhar Mohol : राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक; केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Pakistan Crisis: बापरे! पाकिस्तानात एका गॅस सिलिंडरची किंमत पोहचली ७ हजारांवर; कारण काय?

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

SCROLL FOR NEXT