I wanted to be a doctor but I got IPS the journey of Abhaysinh Deshmukh from Pandharpur taluka 
सोलापूर

'डॉक्‍टर व्हायचे होते, पण झालो आयपीएस'; पंढरपूर तालुक्‍यातील अभयसिंह देशमुख यांचा प्रवास 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : शेतकरी कुटुंबात राहून देखील एका उच्च ध्येयाने प्रेरित होवून कासेगाव (ता. पंढरपूर) येथील अभयसिंह बाळासाहेब देशमुख यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले आहे. लहानपणापासूनच डॉक्‍टर बनायचे स्वप्न होते, पण आयपीएस झालो. लोकांची सेवा करण्याबरोबरच पिडितांना न्याय देण्याचे मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे अभियसिंह देशमुख यांनी आज सकाळशी बोलताना सांगितले. 
आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. त्यामध्ये अभियसिंह देशमुख यांची आयपीएस म्हणून निवड झाली आहे. अभयसिंह हे लहानपणापासूनच शाळेत हुशार होते. दहावीपर्यंतचे शिक्षण येथील इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये झाले. अकरावी व बारावी येथील के.बी.पी कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर पुणे येथील कॉलेज आफ इंजिनिअरींगमधून सिव्हील इंजिनिअरींगची पदवी घेतली. इंजिनिअर झाल्यानंतर कुठेही मोठ्या पगाराची नोकरी मिळाली असती, परंतु, नोकरी न करता पुणे येथे राहून स्पर्धा परिक्षेचा अभ्यास केला. तीन वर्षापासून ते प्रयत्न करत होतो. गेल्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळाले होते. मात्र रॅंकमध्ये 503 क्रमांक मिळाला होता. त्यांची इंडियन कॉर्पोरेटमध्ये निवड देखील झाली होती. परंतु, आयपीएसचे होण्याचे माझे स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते, त्यानंतरही पुन्हा लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरु केला. त्यामध्ये आयपीएसचे स्वप्न सत्यात उतरले. या परीक्षेत 151 व्या क्रमांकाने ते उतीर्ण झाले आहेत. 
अभयसिंह यांचे वडील बाळासाहेब देशमुख हे कासेगाव येथे शेती करतात. डाळिंब आणि द्राक्ष शेतकरी म्हणून त्यांची परिसरात ओळख आहे. शेतकरी कुटुंबात राहून देखील अभयसिंह यांनी आयपीएस पदाला गवसणी घातली आहे. ग्रामीण भागात राहून त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांचे हे यश ग्रामीण भागातील अनेक तरुणांना आपल्या ध्येयापर्यंत पोचवण्यासाठी नक्कीच प्रेरणा देणारे आहे. 

अभयसिंह यांचे वडील बाळासाहेब देशमुख म्हणाले, की अभयसिंह गेल्या तीन वर्षापासून आयपीएससाठी प्रयत्न करत होता. आज शेवटी त्याच्या या कष्टाला यश आले. त्याची जिद्द, मेहनत आणि कष्ट करायची तयारी पाहुन आम्ही देखील थक्क हायचो. आम्ही शेतकरी असल्यामुळे तो सुट्टीला आला की गावात येवून शेती बद्दल विचारायचा. त्याचे शेतीवरचे प्रेम पाहून आम्हालाही त्याचा अभिमान वाटतो. आयपीएस होवून त्याने आमचे, गावाचे आणि तालुक्‍याचे नाव मोठे केले आहे. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT