Ajinkya Vidyagar
Ajinkya Vidyagar 
सोलापूर

एमपीएससी दोनदा उत्तीर्ण, मात्र तिसऱ्या प्रयत्नात बार्शीचे अजिंक्‍य विद्यागर आयएएस !

प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दोन वेळा उत्तीर्ण झालो. पण जिल्हाधिकारी होण्याची इच्छा होती. त्यामुळे यूपीएससीची तयारी सुरूच होती. शिक्षण सुरू असताना दोन वेळा यूपीएससी परीक्षा दिली, पण यश आले नाही. आता तिसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र यश प्राप्त झाल्याचे बार्शी येथील अजिंक्‍य विद्यागर यांनी सांगितले. 

शिक्षणाशिवाय आपण काहीच करू शकत नाही. उच्च शिक्षण घेतले तर उच्च पदांपर्यंत पोचता येते. समाजाची सेवा करता येते. शासनाच्या विविध योजनांची समाजातील अखेरच्या घटकांपर्यंत माहिती होत नाही अन्‌ लाभही होत नाही. त्यासाठी जिल्हाधिकारी होऊन कार्य करण्याची इच्छा मनाशी बाळगून अभ्यास केला आणि आज यशस्वी झालो, अशी भावना आयएएस परीक्षा उतीर्ण झालेल्या बार्शी येथील अजिंक्‍य विद्यागर यांनी व्यक्त केले. 

अजिंक्‍य यांचे वडील प्रा. अनंत विद्यागर हे बार्शी येथील बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमधून सेवानिवृत्त झाले आहेत तर आई आशा जोगदंड-विद्यागर आगळगाव येथील लोकसेवा विद्यालयात मुख्याध्यापिका आहेत. बहीण प्रियांका एमपीएससी उत्तीर्ण आहे. अजिंक्‍य यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण महाराष्ट्र विद्यालय येथे तर आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण सुलाखे हायस्कूलमध्ये झाले. पुन्हा अकरावी, बारावी कला शाखेत प्रवेश घेतला. अजिंक्‍य यांचा पदवीला पॉलिटिकल सायन्स हा विषय होता. पदवीचे शिक्षण आबासाहेब गरवारे कॉलेज, पुणे येथे घेतले. पुणे विद्यापीठात 2018 मध्ये पॉलिटिकल सायन्स या विषयात सेट-नेट परीक्षा उत्तीर्ण झाले. 

आपल्या यशाबद्दल अजिंक्‍य विद्यागर म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील परीक्षा दोन वेळा उत्तीर्ण झालो. पण जिल्हाधिकारी होण्याची इच्छा होती. शिक्षण सुरू असताना दोन वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली, पण यश आले नाही. तिसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र यश प्राप्त झाले. खासगी क्‍लास व सेल्फस्टडी करून यश संपादन केले असून, 489 रॅंकने यशस्वी झालो. आई-वडील यांच्यासह मंडोदरी वाकडे (सोलापूर), बार्शीचे सुपुत्र जिल्हाधिकारी महादेव धारूरकर, शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्यामुळे यशस्वी झालो. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT