aslam parvej.jpg 
सोलापूर

उर्दू भाषिक विद्यार्थ्यांनी मराठीतही प्राविण्य मिळवावे : माजी कुलगुरू डॉ.अस्लम परवेज 

प्रकाश सनपूरकर

सोलापूर ः उर्दूचा विकास जेवढा महाराष्ट्रात होतोय तेवढा देशात कुठेही होत नाही. महाराष्ट्रात उर्दू माध्यम शाळा उत्कृष्ट कार्य करत आहेत व ते मराठी व इंग्रजी माध्यम शाळाबरोबर गुणवत्तेसाठी प्रयत्नशील आहेत. उर्दू विद्यार्थ्यांनी मराठी आत्मसात करून त्यात नैपुण्य मिळविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मौलाना आजाद उर्दू विश्वविद्यालय, नवी दिल्लीचे माजी कुलगुरू डॉ. अस्लम परवेज यांनी एका राष्ट्रीय वेबिनारच्या उद्घाटनप्रसंगी काढले. 
येथील खादिमाने उर्दू फोरमच्या वतीने सहाव्या अशरा-ए-उर्दूच्या पहिल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. उर्दू व सायन्स या विषयावर पहिले सत्र आयोजित करण्यात आले होते. 
आपल्या भाषणांत ते पुढे म्हणाले, प्राथमिक शिक्षण मातृभाषेत झाले तरच व्यक्तिमत्वाचा विकास होतो. जेवढ्या जास्त भाषांवर प्राविण्य मिळवेल तेवढा विद्यार्थी उच्च व्यक्तिमत्वाचा होईल. स्थानिक भाषावर प्रभुत्व प्राप्त करणे म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेत आपले योगदान देणे आहे. भाषेच्या माध्यमातून जी दरी निर्माण होते ती दूर करण्यास मदत मिळते. 
उर्दू ही सर्वांना आवडते त्यातील गोडावा व शिष्टाचार लोकांना आकर्षित करतो. भाषामध्ये जोपर्यंत साहित्य (इन्फॉर्मेटीव्ह लिटरेचर) येत नाही तोपर्यंत भाषा सशक्त होत नाही. त्यामुळे उर्दूला शास्त्र व टेक्‍नॉलॉजीही जोडणे आवश्‍यक आहे. प्रारंभी सहसचिव महेमूद नवाज यांनी स्वागत केले. फोरमचे अध्यक्ष विकारअहमद शेख यांनी फोरमच्या कार्याची माहिती दिली. अन्वर कमिशनर यांनी पाहुण्याची ओळख करून दिली. 
त्यापुर्वी शाहीन ग्रुप बिदरचे डॉ.अब्दुल कदीर यांनी या अशरा-ए-उर्दू 2021चे उद्घाटन केले. त्यांनी फोरमद्वारे शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे पुनर्वसन कार्यक्रम राबविण्यात येत असल्या सांगून त्यांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे संयोजन कादिरहुसेन चोबदार यांनी केले. मेहमूद नवाज यांनी आभार मानले.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT