सोलापूर

`या`शहरातील पाच रुग्णालयांना 25 हजारांचा दंड, कारण.... 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर केल्याप्रकरणी शहरातील पाच रुग्णालयांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला. विशेष मोहिमेच्या पहिल्या दिवशी राबविण्यात आलेल्या तपासणीत विविध ठिकाणांहून 120 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. एकूण नऊ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन 45 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. 

दंडात्मक कारवाई याप्रमाणे ः निर्मल हॉस्पिटल, दीप हॉस्पिटल, यशोधरा हॉस्पिटल, कोठाडिया हॉस्पिटल व सिटी हॉस्पिटल, आडकी ट्रेडर्स, सारिका ट्रेडर्स, भास्कर ट्रेडर्स आणि कुमार भिंग्रे यांच्याकडून 120 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. हा पहिला गुन्हा असल्याने प्रत्येकी पाच हजार रुपये दंड करण्यात आला. यापुढे प्लास्टिक आढळल्यास प्रत्येकी 10 हजार रुपये दंड आणि तिसऱ्यांदा प्लास्टिक आढळले तर 25 हजार रुपये दंड आणि तीन महिने शिक्षा अशी तरतूद असल्याची कल्पना संबंधितांना देण्यात आली. 

2 मार्च ते 30 एप्रिल या कालावधीत विशेष मोहीम
प्लास्टिकमुक्तीसाठी राज्य शासनाने 2 मार्च ते 30 एप्रिल या कालावधीत विशेष मोहीम राबविण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार महापालिकेने कृती आराखडा केला आहे. मोहिमेच्या पहिल्या दिवशी महापालिकेचे आठही विभागीय कार्यालय आणि अन्न व परवाना विभागामार्फत ही मोहीम राबविण्यात आली. त्यात एकूण 64 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 59 ठिकाणची तपासणी केली. त्यापैकी नऊ ठिकाणी प्लास्टिक आढळून आले. विशेष नियोजनांतर्गत 2 ते 4 मार्च या कालावधीत शहरातील सर्व रुग्णालयांची तपासणी केली जाणार आहे. 



 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानातील हॉस्पिटलवर हल्ला, ४०० लोकांचा मृत्यू, २५० हून अधिक जखमी झाल्याचा तालिबानचा दावा

इंग्रजी शाळांमध्ये मिळणार मोफत प्रवेश! ‘आरटीई’ प्रवेशासाठी 25 मार्चपर्यंत करता येणार अर्ज, पालकांना घरापासून 5KM अंतरातील निवडता येणार शाळा

Panchang 17 March 2026: आजच्या दिवशी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

Gulabrao Patil: केंद्राने निधी अडवल्याने ‘जलजीवन’ला खीळ; मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती, २५ हजार ६१ योजनांची कामे ठप्प!

अग्रलेख : बाहुली बोलकी झाली…

SCROLL FOR NEXT