Kapse Smita.jpg
Kapse Smita.jpg 
सोलापूर

कोरोना फायटर ग्रुपच्या माध्यमातून दिले ऑनलाइन शिक्षण

संतोष सिरसट
सोलापूर ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेवाडी-अ (ता. माळशिरस) येथील शिक्षिका स्मिता कापसे-देशमुख यांनी ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे ऍन्ड्रॉईड मोबाईल नाहीत, त्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी चांगला कल्पना लढविली. त्यासाठी त्यांनी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडे असलेल्या मोबाईलचा वापर अतिशय खुबीने केला. त्या विद्यार्थ्यांना बोलावून त्यांच्याकडे असलेल्या मोबाईलच्या माध्यमातून कापसे यांनी कोरोना फायटर ग्रुपची निर्मिती केली. ज्या विद्यार्थ्यांकडे ऍन्ड्रॉईड मोबाईल नाहीत त्यांचे अध्ययन त्या माध्यमातून सुरू केले.

केवळ मोबाईल नाहीत म्हणून कोणतेही विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहणार नाहीत, याची काळजी कापसे यांनी घेतली. त्यांनी त्या माजी विद्यार्थ्यांच्या ग्रुपला कोरोना फायटर हे नाव दिले. त्या कोरोना फायटरला प्रत्येकी पाच-पाच मोबाईल नसणारे परिसरात राहणारे सहावी व सातवीचे विद्यार्थी जोडून दिले. या पाच विद्यार्थ्यांना कोरोना फायटर ग्रुपवर टाकलेले व्हिडीओ कोरोना फायटर त्यांना दाखवून मार्गदर्शन करू लागले. मुलांना दिलेला अभ्यास तपासून लागले. ज्या विद्यार्थ्यांचा चांगला अभ्यास असेल त्याला बेस्ट, बऱ्यापैकी अभ्यास असेल तर बेटर आणि समाधानकारक नसेल तरी गुड रिमार्क देऊ लागले. त्यामुळे मुले काळजीपूर्वक अभ्यास करू लागली. नियमितपणे अभ्यास तपासून घेऊ लागली. तपासणी केलेल्या अभ्यासाचे फोटो कोरोना फायटर मला पाठवू लागले. त्यामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया गती घेऊ लागली. ऑनलाइन अध्यापनाबरोबरच ऑफलाइन अध्यापन यशस्वी झाले. खरच कोरोना योद्धा आपल्या गावासाठी, शाळेसाठी वेळ देऊ लागले. ज्याप्रमाणे डॉक्‍टर, सफाई कामगार विविध समाजसेवी संघटना कोवीड काळात योगदान देत आहेत, त्याचप्रमाणे हे माजी विद्यार्थी योगदान देत आहेत. त्यामुळे तेही शिक्षणप्रवाहातील कोरोना योद्धेच आहेत. शाळा सुरू झाली की या विद्यार्थ्यांना कोवीड योद्धा म्हणून गौरव करण्याचा निर्णय कापसे यांनी घेतला आहे.

कोरोना संकटामुळे आता संवाद संपला असे वाटले. पण तशा काळात मदत झाली ती अद्ययावत टेक्‍नॉलॉजीची. विद्यार्थ्यांचे व्हॉटसऍप ग्रुप कापसे यांनी सुरवातीपासूनच केले होते. त्याद्वारे अध्यापन करायचे अशी मनाशी खूणगाठ बांधली. सहावी व सातवीच्या वर्गासाठी झूम ऍप व गुगल मीट ऍप त्याचबरोबर मायक्रोसॉफ्ट टिम्सच्या मदतीने अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया सुरु केली. यात गणित, विज्ञान विषयाचे ऑनलाइन वर्ग त्यांनी सुरु केले. यूट्यूबच्या माध्यमातून सेमी सायन्सचे व्हिडीओ तयार करून सप्टेंबर अखेर अभ्यासक्रम पूर्ण केला. यात गणित विषयाचे 135, सेमी सायन्सचे 45 तर विज्ञानाचे 75 व्हिडीओ तयार केले. गुगल फॉर्मच्या माध्यमातून प्रत्येक घटकावर चाचण्या तयार करून कापसे यांनी विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन सोडवून घेतल्या.

ऑनलाईन भाषणे, थोर महात्म्यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करणे, इयत्ता सातवीतील क्रांती एकतपूरे, स्नेहल गोडसे या विद्यार्थ्यांची चित्रे राज्यस्तरीय तंत्रस्नेही शिक्षक समूहात विशेष आकर्षक ठरली. तसेच "कवीश्री' या कवी समूहाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय चारोळी लेखन स्पर्धेत इयत्ता सातवीतील विद्यार्थी सावणकुमार वाघमोडे याने प्रथम क्रमांक पटकावला. काही विद्यार्थ्यांनी "घरच्या प्रयोगशाळेतून' या उपक्रमात घरातून विज्ञान विषयावर आधारित प्रयोग व्हिडीओच्या माध्यमातून सादर केले. तंत्रस्नेही शिक्षक समूहामार्फत 28 मेला घेण्यात आलेल्या जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सिमरन काझी या विद्यार्थ्यांनीने प्रथम क्रमांक तर स्नेहल गोडसे या विद्यार्थ्यांनीने निबंध लेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. 23 मार्चला माळेवाडीतील विद्यार्थ्यानी जागतिक पुस्तक दिन ऑनलाइन वाचन करून साजरा केला. यू ट्यूबच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण तासिका व श्‍यामची आई कथामाला सुरू केली. अत्यावश्‍यक सेवा देणारे डॉक्‍टर, पोलिस, सफाई कामगार यांचे आभार मानणे असे अनेक ऑनलाइन उपक्रम कापसे यांनी राबविले.

"एससीइआरटी'च्या उपसंचालिका कमलादेवी आवटे यांचे स्त्री व पर्यावरण या विषयावर झूम ऍपच्या माध्यमातून विद्यार्थी व पालक यांच्यासाठी ऑनलाइन मार्गदर्शन ठेवले. विद्यार्थ्यामध्ये अवांतर वाचन गोडी निर्माण व्हावी म्हणून कापसे यांनी चित्रनाट्यकर्मी, उत्कृष्ट अभिनेता चिन्मय केळकर यांचे कथावाचनासाठी ऑनलाइन मार्गदर्शन ठेवले होते.

"अग्निपंख'च्या जिल्हा समन्वयकपदी कापसे
महाराष्ट्र राज्य अग्निपंख फाउंडेशनच्या सोलापूरच्या जिल्हा समन्वयकपदी स्मिता कापसे-देशमुख यांची निवड केली आहे. शाळेतील आदर्श, उपक्रमशील, तंत्रस्नेही, विज्ञान विषय शिक्षिका कापसे यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध विज्ञान विषयक व्हिडिओ निर्मिती केली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास साधण्यासाठी सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम 2001 पासून अविरतपणे राबविले आहेत.

संपादन : अरविंद मोटे

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT