Utopian 
सोलापूर

युटोपियन शुगर्सची आघाडी ! 35 दिवसांत केले 1.54 लाख टन उसाचे गाळप 

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : यंदाच्या हंगामात गाळप उसाचा दर निश्‍चित नसतानाही स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या विश्वासार्हतेमुळे तालुक्‍यातील कचरेवाडी येथील युटोपियन शुगर्सने 35 दिवसांत 1 लाख 54 हजार टन ऊस गाळप करून तालुक्‍यात आघाडी घेतली आहे. 

सध्या ऊस दरावरून इतर जिल्ह्यांत आंदोलने सुरू असून त्याचे लोण तालुक्‍यातही आले. दरवर्षीच्या गाळपाच्या सुरवातीला ऊस दरावरून निर्माण होणारी कोंडी फोडण्यात स्व. सुधाकरपंत परिचारक यांचा मोठा वाटा असायचा. त्यांची अनुपस्थिती ऊस उत्पादकांसह आंदोलकांनाही जाणवू लागली आहे. शेवटी आंदोलनापेक्षा तोडगा महत्त्वाचा आहे. निश्‍चित कालावधीत उसाचे गाळप होणे आवश्‍यक आहे. यंदा मजुरांच्या तुटवड्याबरोबरच कोरोनाचा फटका देखील बसला आहे. मजूर मिळत नसल्याने गाळप विलंब होण्यास कारणीभूत ठरला असला तरी युटोपियन कारखान्याने ऊसतोड मजुरांना पूरस्थितीत जीवनावश्‍यक साहित्य थेट फडात देत सामाजिक बांधिलकी जपली. युटोपियन कारखान्याबद्दल ऊस उत्पादकांबरोबर मजूर, तोडणी व वाहतूक ठेकेदारांचाही विश्वास वाढला. दिवाळीला ऊस बिलाबरोबरच कामगारांना बोनस देण्यातही युटोपियनने जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. 

सध्या तालुक्‍यात तीन कारखान्यांचे गाळप वेगाने सुरू आहे. फॅबटेक शुगर्स बंद असल्याने ऊस उत्पादक सध्या भैरवनाथ व दामाजीकडे ऊस गाळपास दिला जात आहे. त्यामुळे हे तिन्ही कारखाने वेगाने गाळप करू लागले. युटोपियन शुगर्सने 25 नोव्हेंबर अखेर 35 दिवसांत 1 लाख 54 हजार 813 मे. टन ऊस गाळप केले असून प्रतिदिन 7.30 रिकव्हरीनुसार 1 लाख 12 हजार 400 क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. तर 1 कोटी 19 लाख 48 हजार इतकी युनिट वीज निर्मिती करून 76 लाख 59 हजार युनिट इतकी वीज निर्यात केली आहे. 

यंदा उसाची उपलब्धता चांगली असून हंगामाच्या सुरवातीला सातत्याने पडलेल्या पावसामुळे हंगाम सुरू करण्यास अडचणी आल्या. तरीही आमच्या कारखान्याच्या शेती विभागाने हंगाम सुरू करण्याचा निश्‍चय केला. ऊस उत्पादकांकडून कारखान्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. सततच्या पावसामुळे व पाण्यातील उसामुळे रिकव्हरीसुद्धा कमी प्रमाणात मिळत आहे. कारखान्याचे 4500 च्या सरासरीने गाळप चालू आहे. सध्या बाजारपेठेत साखरेला अपेक्षित मागणी नसल्याने कारखान्याकडे साखर विक्रीशिवाय पडून आहे. अशा परिस्थितीमध्येही कारखान्याने ऊस उत्पादकांच्या हिताचा विचार करून उचल म्हणून गाळप झालेल्या उसास प्रति टन 1700 रुपयांप्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग केलेली आहे. उचल रक्‍कम म्हणजे फायनल ऊस बिल नव्हे, ही बाब महत्त्वाची आहे. कारखान्याकडे ज्या-ज्या ऊस उत्पादकांनी नोंदी दिल्या आहेत त्या सर्वांचा ऊस गाळपासाठी आणून युटोपियन शुगर्स आपले अपेक्षित उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्नशील राहील. 
- उमेश परिचारक,
चेअरमन, युटोपियन शुगर्स लि., कचरेवाडी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT