Vaibhav of Karmala dist Solapur first in state MPSC exam 
सोलापूर

बारावीत नापास; आता राज्यात अव्वल 

अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : बारावीच्या परीक्षेत दोन वेळा नापास झालेला करमाळ्याचा वैभव अशोक नवले हा पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत 340 पैकी 267 गुण मिळवून राज्यात पहिला आला आहे. वैभव नवलेचे वडील करमाळा एसटी आगारात लिपिक या पदावर कार्यरत होते. ते 2019 ला सेवानिवृत्त झाले आहेत. नवले यांचे मूळ गाव कंदर (ता. करमाळा) आहे. मात्र, वैभव नवले यांचा जन्मच करमाळा येथे झाला. 
वैभव नवलेंचे प्राथमिक शिक्षण नगरपरिषद प्राथमिक शाळा नंबर तीनमध्ये झाले असून पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण महात्मा गांधी विद्यालय, करमाळा येथे झाले. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा येथे बीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून तो इतिहास विषयात बीए झाला आहे. दहावीनंतर त्याने महात्मा गांधी विद्यालय, करमाळा येथे विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. 2009 ला तो चार विषयांत नापास झाला. त्यानंतर दादा पाटील विद्यालयात बारावीला पुन्हा 2010 ला प्रवेश घेतला. त्या ठिकाणीही तो चार विषयांत नापास झाला. त्यानंतर त्याच्या वडिलांच्या मित्राच्या सल्ल्यानुसार आलेगाव (ता. माढा) येथे कला शाखेकडून बारावीला प्रवेश घेतला व 2011 ला तो 79 टक्के गुण मिळून विद्यालयात पहिला आला. 
त्यानंतर इतिहासात बीए पूर्ण क्षमतेने पूर्ण केले. गेल्या चार वर्षांपासून मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. यापूर्वी दोन वेळा त्यांची संधी हुकली होती. यावेळी मात्र तो महाराष्ट्रात पहिला आला आहे. 
वैभव म्हणाला, ""या वेळी मी पीएसआयची परीक्षा पास होणार हे निश्‍चित होते. मात्र, मी राज्यात पहिला येईल असे कधी वाटले नव्हते. राज्यात पहिला आल्याचे समजल्यानंतर माझा आनंद गगनात मावला नाही.'' 

कुणालने आत्मविश्‍वास वाढवला 
माझ्या यशाचे श्रेय माझे आई-वडील यांना मी देतो. मित्र पोलिस उपनिरीक्षक कुणाल घोलप हा कायम आत्मविश्‍वास वाढवत राहिला. तो मागच्या वर्षी पीएसआयची परीक्षा पास झाला. माझा मात्र एक गुणांना क्रमांक गेला होता, याची खंत कुणालला कायम होती. आज निकाल लागला आणि मी महाराष्ट्रात पहिला आलो, हे ऐकून माझ्यापेक्षा जास्त आनंद माझे मित्र व नातेवाईक यांना झाला. 
- वैभव नवले, करमाळा 

एका गुणाने मागे राहिला 
मला दोन मुली, एक मुलगा आहे. एसटी आगाराच्या कमी पगारात घर चालवत संसार केला. कुणालची स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा होती. त्या दृष्टीने तो गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न करत होता. यापूर्वी तो एक गुणाने मागे राहिला. या वेळी मात्र तो महाराष्ट्रात पहिला आला. जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. 
- अशोक नवले, 
वैभवचे वडील, करमाळा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात पुण्यातील मध्यवर्ती भागात जड वाहनांना बंदी; पोलिस उपायुक्ताकडून आदेश जारी

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT