vegetable.jpg 
सोलापूर

उन्हाळी हंगामात पालेभाजी व फळ उत्पादकांचे हाल 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: ग्रामीण भागातील शेतकऱ्याने पिकवलेला पालेभाजी व फळांच्या तयार मालाला बाजारात आणण्यासाठी वाहतुकीचा अडथळा ओलांडून बाजारात पोचवणे कठीण झाले आहे. जे उत्पादक माल बाजारात पोचवत आहेत त्यांना दर मिळत नाही. उत्पादकांची व बाजारपेठेची साखळी तुटल्याचा फायदा मात्र भलत्यांनाच होत आहे. 
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी उन्हाळ्याच्या हंगामासाठी अनेक प्रकारची पिके घेतली आहेत. 
यात कलिंगड, खरबूजसारखी फळे आहेत. तसेच उन्हाळ्यात अनेक भाज्यांना चांगली मागणी असल्याने दर मिळण्याच्या आशेने लागवड केली. यात पालक, दोडका, टोमॅटो सारख्या अनेक भाज्या आहेत. एवढेच नव्हे तर शेवगा, लिंबू यांना उन्हाळ्यात मागणी असते. पालेभाजी नाशवंत असल्याने तातडीने काढणी करून बाजारात आणणे आवश्‍यक असते. 
मात्र, लॉकडाउनने खेड्यातून पालेभाजी व फळांची वाहतूक करताना अडचण येत आहे. शेतमाल वाहतुकीसाठी प्रत्यक्षात मुभा आहे. तरी देखील विनाकारण चौकशांचे अडथळे नको याकरिता उत्पादकांना माल बाजारात आणता आला नाही. 
काहींनी कसाबसा माल बाजारात आणला तर लॉकडाउनने ग्राहक नसल्याने दर पुरेसा मिळत नाही. कांद्याचे दर एकाच आठवड्यात एक हजार रुपयांनी कोसळले. चांगल्या दर्जाचा कांदा 13 रुपये किलो विकला गेला. कलिंगड व खरबुजाचे दराने दोन आकडी संख्या देखील गाठली नाही. उत्पादकांचा लागवड खर्च देखील निघाला नाही. उन्हाळ्यातील पालेभाजी व फळ विक्रीचा हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे. 
मात्र, कमी दराने माल घेऊन त्यातील कांद्यासारखा माल साठवला जात आहे. अन्य कमी दराने घेतलेला माल जास्त दराने विकला जात आहे. ठोक बाजारात उत्पादकांना दर मिळेना अन्‌ किरकोळ बाजारात जास्त दराने विक्री अशी उघड उघड स्थिती निर्माण झाली आहे. अनेक उत्पादकांनी स्वतः माल शहरात विकण्याचे प्रयत्न केले तर पोलिस त्यांना उठवत आहेत. 

 
शेतमाल वाहतुकीची साखळी तुटली 
उन्हाळी हंगामातील पालेभाजी व फळ उत्पादनास फटका 
ठोक बाजारात दरही झाले कमी 
उत्पादकांचा लागवड खर्च निघेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT