Vegitable. 
सोलापूर

भाजीपाला उत्पादक शेतकरी हतबल ! दरात मोठी घसरण; मालाची आवकही वाढली 

राजाराम माने

केत्तूर (सोलापूर) : कोरोना महामारीत लॉकडाउन, परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतातील भाजीपाला पिके सडून, नासून गेली. आवक कमी झाली व त्यामुळे भाजीपाल्याचे दर उच्चांकी पातळीवर गेले होते. परतीचा पाऊस गेल्यानंतर शेतकऱ्यांनी केलेला भाजीपाला व पिके सध्या बदलत्या वातावरणाचा, हवामानाचा सामना करीत तयार झाली आहेत. परंतु सध्या बाजारामध्ये भाजीपाला पिकांची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. 

भाजीपाल्याला चांगला भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी भाजीपाला पिके घेतली. परंतु केलेला खर्चही निघत नसल्याने ज्यादा दर मिळण्याच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे आता भाजीपाला पिकांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. कारण, भाजीपाला उत्पादनासाठी रोपे, औषधे, कीटकनाशके, मजुरी, वाहतूक या सर्व बाबींसाठी मोठा खर्च होऊनही दर मात्र कमी झाल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. 

रोजच बदलणाऱ्या हवामानामुळे वांगी, फ्लॉवर, टोमॅटो, कारली, दोडका, भेंडी आदी भाजीपाला पिकांना विविध रोगांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होत आहे व दरही चांगला मिळत नाही, ही उत्पादकांची शोकांतिका झाली आहे. 

शेतकऱ्यांनी आपल्या मोकळ्या झालेल्या जागेत दोन पैसे हाती येतील म्हणून भाजीपाला पिकांना पसंती दिली. कोरोना महामारीचे संकट व परतीचा पाऊस याही संकटातून तो सावरला असतानाच, आता येणाऱ्या भाजीपाला पिकातून चार पैसे मिळतील यावर तो आशा लावून होता. परंतु बदलत्या वातावरणाचा फटका या पिकाला बसला असून बाजारात भाजीपाला पिकाची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याने दर अचानक कमी झाले आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT