Vegetables can be sold to farmers in 21 places of solapur 
सोलापूर

शेतकऱ्यांना दिलासा! सोलापुरात या 21 ठिकाणी विकता येणार भाजीपाला

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील सध्याच्या भाजी मंडईत जागा अपुरी पडत असल्याने खूपच गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे शहरातील 21 ठिकाणे निश्चित केले असून त्याठिकाणी सकाळी 10 ते दुपारी एक या वेळेत जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, लोकांना त्यांच्या वेळेत त्यांच्याच परिसरात भाजी, फळे, शेतीची अवजारे, खते, बियाणे, धान्य खरेदी करता यावे या हेतूने हा निर्णय घेतल्याचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले.
दूध खरेदी व विक्री आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत फळे व भाजीपाला विक्रीची वेळही सकाळी सहा ते नऊ ठेवली आहे. तर बाजार समितीतील भुसार दुकाने, किराणा दुकाने, खते, बियाणे, किटकनाशके, कृषी यंत्रांची विक्री आणि रेशन दुकाने सकाळी 10 ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. कोणत्याही वस्तूच्या खरेदीसाठी ग्राहकाकडे वाहन नसावे, अन्यथा जप्त केले जाईल, असा इशाराही या आदेशात दिला आहे. रेशन व किराणा दुकाने, भाजी मार्केट, भुसार दुकानातून वस्तू खरेदी करताना विक्रेता व ग्राहकांनी सामाजिक अंतराचे पालन करणे, घराबाहेर पडताना मास्क घालणे बंधनकारक असणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा मोडल्याचा गुन्हा दाखल होणार आहे.  वस्तू खरेदी करताना विक्रेत्यांचा दुकानांसमोर गर्दी होईल, अथवा नियमांचा भंग होईल, त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.

शहरात नव्याने सुरू होणाऱ्या भाजी मंडई
होम मैदान, स्टेशन मार्केट, सुंदराबाई डागा, मनपा शाळा देगाव, शासकीय मैदान, नेहरूनगर, श्री. शरदचंद्र पवार शाळा, अभिषेक नगर, ए. जी. पाटील शाळेसमोर, एसआरपीशेजारी, गांगजी मैदान, हत्तुरे वस्ती, जुनी विडी घरकूल मैदान, शाळेसमोर, नीलम नगर (बनशंकरी हॉटेल), एमआयडीसी, जुळे सोलापूर पोलीस चौकीसमोर, मरीआई भाजी मंडई, जय भवानी प्रशाला मैदान (घोंगडे वस्ती), हनुमान मंदिरामागे बाळे, चिप्पा मार्केटजवळील मैदान, सुपर मार्केट, कस्तुरबा मंडईजवळ मनपा शाळा-21, नई जिंदगी (विमानतळ मागे) मांस मंडई (मंगळवार पेठ), सुंदरम नगर (आरटीओ कार्यालयाजवळ), इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम (अश्विनी हॉस्पिटलजवळ).

गर्दी होऊ नये म्हणून
सध्या सुरू असलेल्या भाजी मंडईच्या जागा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे ग्राहकांची गर्दी होत असल्याने कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांच्या सुरक्षितता म्हणून त्यांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी अधिक वेळ आणि मोकळी जागा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जेणेकरून गर्दी होणार नाही आणि नियमांचे पालन होईल.
- अंकूश शिंदे, पोलिस आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT