janavare.jpg 
सोलापूर

लॉकडाउनने लाखो रुपयांचा दोडका जनावराला खाऊ घालण्याची वेळ 

सकाळ वृत्तसेवा

चिखलठाण  ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शेतात पिकलेला भाजीपाला विकला जात नसल्याने शेटफळ (ता. करमाळा) येथील शेतकऱ्यावर आपल्या शेतातील दोडका जनावरांना खाऊ घालण्याची वेळ आली आहे. 
सध्या कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन स्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मोठ्या कष्टाने पिकवलेली पिके मागणीअभावी तशीच शेतात पडून खराब होऊ लागली आहेत. शेटफळ येथील शेतकरी विकास गुंड यांनी आपल्या शेतात दोन एकर क्षेत्रावर दोडका पिकाची लागवड केली होती. 
दोन एकर दोडक्‍याचे पीक उभे करण्यासाठी त्यांनी आजपर्यंत बियाणे, खते, मल्चिंग, खुरपणी, मशागत व अन्य साहित्य यासाठी मोठा खर्च केला. नुकताच दोडका मार्केटला विक्रीसाठी पाठवण्याच्या काळातच लॉकडाउन सुरू झाल्याने सुरवातीच्या 30 कॅरेटचे फक्त दोन हजार रुपये आले. एवढा मोठा खर्च करून देखील मालच बाजारात नेता आला नाही. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. नाईलाजाने त्यांनी हाती आलेले दोडके जनावरांना खाण्यासाठी टाकून दिले. 
स्थानिक बाजारात त्याला मागणी नाही. शहरात विक्रीसाठी नेता येत नाही. स्थानिक व्यापारी मातीमोल दराने मागत असल्यामुळे पिके शेतातच खराब होऊन नासू लागली आहेत. शेतातील या काढणीयोग्य पिकाच्या खरेदीची व्यवस्था शासनाने करावी अथवा सर्व पिकांचे पंचनामे होऊन शासनाकडून भरपाई मिळण्याची मागणीही शेतकऱ्यांतून केली जात आहे. 

मालच विकत नसल्याने मोठे अर्थिक नुकसान झाले
माझ्या दोन एकर क्षेत्रावर दोडक्‍याच्या पिकासाठी आजपर्यंत एक लाख 20 हजार रुपये खर्च केला. एकूण 18 टन माल निघून पाच लाख रुपयापर्यंत उत्पन्न अपेक्षित होते. माल सुरू होताच लॉकडाउन सुरु झाला. लवकरच परिस्थिती सुरळीत होईल म्हणून माल तोडला नाही. पिकाच्या ओझ्याने सर्व स्टेजिंग तुटून खाली पडले आहे. सध्याच्या परिस्थितीत मालच विकत नसल्याने मोठे अर्थिक नुकसान झाले आहे. 
- विकास गुंड, शेतकरी, शेटफळ, ता. करमाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुणी गॅस देता का गॅस? मुंबईत ४-५ किमीपर्यंत रांगा, पुण्यात पहाटेपासून लोक रांगेत; काळ्याबाजारात एक किलोसाठी ५०० ते ७०० रुपये

Breaking: IPL 2026 चं वेळापत्रक बदलणार? RCB चे सामने एम चिन्नास्वामीवर होणार की नाही? आले मोठे अपडेट्स

चिंता वाढली! वॉकिंग स्टिकचा आधार घेत BCCI पुरस्कारांसाठी पोहचला टीम इंडियाचा खेळाडू; VIDEO

Latest Marathi Update : गोरेगावात चुलीवर शिजतेय गरीबांची शिव भोजन थाळी

Parner Crime : कीर्तनकाराचा मुलीवर अत्याचार; पारनेर तालुक्यातील प्रकार, आरोपीस पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT