faslela truck.jpg 
सोलापूर

तेथे पावसाच्या आधीच फसताहेत वाहने

सकाळ वृत्तसेवा


माळीनगर(सोलापूर): पंचवीस चार ते टेंभुर्णी मार्गाच्या कॉंक्रिटीकरण झालेल्या रस्त्याच्या साईडपट्ट्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने अवजड वाहने त्यावर फसू लागली आहेत. 

गेली दीड वर्षापासून या मार्गाचे कॉंक्रिटीकरणाचे काम चालू आहे. सध्या कॉंक्रिटीकरणाचे काम बऱ्यापैकी झाले आहे.काम पूर्ण झालेल्या भागातील साईडपट्ट्या मुरूम टाकून भरण्यात आल्या आहेत. त्यासाठी काही भागात मातीमिश्रित मुरूम वापरण्यात आल्याचे दिसून येत आहे. साईडपट्ट्या टणक मुरुमाने भरलेल्या नाहीत. त्यावर पाणी मारून पुरेसे रोलिंग करण्यात आलेले नाही. निकृष्ट काम झालेल्या अशा साईडपट्ट्यांवरून अवजड वाहने गेल्यावर ती फसत आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

काही भागात साईड पट्ट्या काही प्रमाणात खचल्याचे आढळून येत आहे. कठीण मुरूम भरून चांगले रोलिंग न केल्याने कॉंक्रिटीकरण केलेला रस्ता वर आला आहे. तर साईडपट्ट्या खाली गेल्याचे दिसत आहे. वाहने फसल्यानंतर त्यांचे मोठे नुकसान होत आहे. फसलेली वाहने क्रेनने ओढून काढावी लागत आहेत.त्याचा वाहनचालकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. तसेच फसलेली वाहने काढताना नजीकच्या शेताचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. पावसाळ्यात साईड पट्ट्यावर वाहने आणखी फसण्याची शक्‍यता आहे. शिवाय या मार्गावरून ऊसाची वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यामुळे साखर हंगाम सुरू झाल्यावर ऊसाची वाहने साईड पट्ट्यावर फसल्यास अपघाताचे प्रमाण वाढण्याबरोबरच वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याचा संभव आहे. त्यामुळे कंत्राटदाराने या मार्गाच्या साईडपट्ट्या मजबूत कराव्यात,अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: 'नीट पेपर लीक' प्रकरणात सीबीआयकडून चार्जशीट दाखल; शिवराज मोटेगावकरसह 13 आरोपींचा समावेश

Pune Online Toy Car Scam: टॉय कारच्या ऑनलाइन खरेदीत शिवाजीनगरातील महिलेची पावणेचार लाखांची फसवणूक

Shraddha Chopde: 'ज्युदोच्या मॅट'वर शेतकरी कन्येचा सुवर्ण हुंकार! महाराष्ट्राची कन्या श्रद्धा चोपडे पदक जिंकण्यासाठी ग्लासगोला रवाना

Gang Rivalry Foiled: कृष्णा आंदेकरवरील गोळीबाराचा कट उधळला; नंदुरबारला जाताना पोलिस व्हॅनवर हल्ल्याची होती योजना

Shirur Temple Robbery: शिरूर जैन मंदिर दरोडा प्रकरणी तिघांना २५ महिन्यांचा कठोर कारावास; भाविकांत समाधान

SCROLL FOR NEXT