पंचायतराज समितीतील सदस्यांच्या प्रवेशासाठी असे गालीचे अंथरले आहेत. Sakal
सोलापूर

पंचायत राज सामितीच्या स्वागतासाठी मोहोळ पंचायत सामितीमध्ये वेलवेटचे गालीचे

तीन दिवस पंचायत राज समिती सोलापुर जिल्ह्यात असणार आहे

राजकुमार शहा

मोहोळ - पंचायत राज समिती आगमनाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुका पंचायत समितीसह तिच्या आधिपत्या खाली असणाऱ्या प्रत्येक विभागात अपडेटसाठी लगीनघाई सुरू असून, कुठल्या विभागाने काय काम करावयाचे यासाठी 37 सदस्यीय एकूण 9 समित्या गठित केल्याची माहिती नूतन गट विकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे यांनी दिली. दरम्यान पंचायत राज समितीतील सदस्यांच्या प्रवेशासाठी पंचायत समिती कार्यालया समोर वेलवेटचे गालिचे अंथरले आहेत.

पंचायत राज समिती मोहोळ तालुक्यात कधी व कुठल्या ठिकाणी येईल हे सांगता येत नाही. ता 15,16 व 17 जून हे तीन दिवस पंचायत राज समिती जिल्ह्यात असणार आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून आनंदकुमार मिरगणे यांनी नुकताच पदभार घेतला आहे तर मंगळवारी सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून श्रीनिवास पद्मावार हे रुजू झाले आहेत.

पंचायत राज समिती येण्याच्या पार्श्वभूमीवर कार्यालयीन व परिसर स्वच्छतेला वेग आला आहे. तसेच दप्तराची मांडणी,झाडांना पाणी घालणे ही कामे युद्धपातळीवर सुरु आहेत. प्रश्नावली क्रमांक दोन चे बुकलेट तयार करण्याचे काम सुरु आहे. सर्व ग्रामपंचायती, अंगणवाड्या, शाळा, पशुवैद्यकीय दवाखाने, आरोग्यवर्धिनी केंद्र, यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येकाच्या गळ्यात ओळख पत्र दिसू लागली असून कधीतरी दिसणारे अधिकारीही गणवेशा सह आपल्या खुर्चीवर स्थानापन्न असल्याचे चित्र दिसत आहे.

आशा आहेत गठीत केलेल्या समित्या

स्वागत व राजशिष्टाचार समिती, प्रस्ताविक समिती, सभेचे कार्यवृत्त लिखाण समिती, सभागृह व्यवस्था समिती, आरोग्य समिती, कार्यालय व परिसर स्वच्छता समिती, वाहतूक व पार्किंग समिती, कार्यालयीन व्यवस्था समिती, विश्राम गृह व भोजन समिती.

असे आहेत समिती प्रमुख

श्रीनिवास पद्मावार, आनंदकुमार मिरगणे, आनंद शेषगिरी, किरण सूर्यवंशी, डॉ. अरुण पात्रुडकर, ए. जी. बोडरे, सुरेश माने, शशिकांत नरगिडे,टी. एन. दळवे हे काम पाहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT