Veteran writer from Solapur Nirmala Mathapati has died of a heart attack.jpg 
सोलापूर

जेष्ठ लेखिका निर्मला मठपती यांचे हृदयविकाराने निधन

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : येथील ज्येष्ठ लेखिका आणि बालसाहित्यिक निर्मला उत्तरेश्वर मठपती यांचे शनिवारी रात्री साडे दहा वाजता हृदयविकाराने निधन झाले. त्या ७२ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती उत्तरेश्वर मठपती, एक मुलगा, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा रविवारी' (दि.११) ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता कनिष्क नगर, जूळे सोलापूर येथून निघणार आहे.
 
मनातलं आभाळ, बापडी माणसं, गुणी मुलं, काव्यरूप शामचीआई, झेट नावाचं बेट, मुलांसाठी उद्बोधक गोष्टी, वेटिंग लिस्ट आणि संस्काराची शिदोरी यासह ३५ च्यावर त्यांची बालसाहित्याची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच त्यांनी कथा, कादंबरी, चरित्र लेखनही केलं आहे.

इयत्ता तिसरीच्या मराठी बालभारतीच्या पाठ्य पुस्तकातून 'मुग्धा लिहू लागली' हा धडा प्रसिद्ध झाला आहे. त्यांच्या काही पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचे पुरस्कारही मिळाले आहेत. निर्मला मठपती या महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखेच्या कार्यकारणी सदस्य होत्या.

त्यांच्यावर आज रविवारी सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. निर्मला मठपती यांच्या निधनाने मराठी साहित्य परिषद एका बालसहित्यिकाला मुकला आहे. अशा शब्दात महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : भारत अन् श्रीलंकेत संरक्षण क्षेत्रातील तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Pune News : नैरोबीच्या महिलेला मिळाले पुण्‍यात जीवदान! अकरा शस्त्रक्रिया, अन्‌ परदेशी महिलेची मृत्यूशी झुंज यशस्‍वी

SCROLL FOR NEXT