Harikrishna Rachha
Harikrishna Rachha 
सोलापूर

विडी कामगाराचा मुलगा बनला "सीए'

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : पूर्व भागातील सत्तर फूट रोड येथील कामगार दांपत्य श्रीनिवास व चंद्रकला रच्चा... तीन मुले बालाजी, अंबादास व हरिकृष्णा... वडील श्रीनिवास केबल टीव्ही बिल वसुली कामगार तर आई विडी कामगार... आर्थिक बिकट परिस्थितीतून अल्पशिक्षित आई-वडिलांनी दोन मुलांना उच्चशिक्षित केले... अन्‌ नुकतीच तिसऱ्या मुलानेही सीए (चार्टर्ड अकाउंटंट) परीक्षा उत्तीर्ण होऊन आई-वडिलांच्या कष्टाला फळ मिळवून दिले. या यशामुळे रच्चा परिवाराचे समाजबांधव व मित्र परिवाराकडून कौतुक होत आहे.

मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही
सोलापूर सूत मिलचे कामगार असलेले श्रीनिवास रच्चा हे मिल बंद पडल्यामुळे बेरोजगार झाले. त्यांच्या पत्नी चंद्रकला या विडी वळण्याचे काम करत होत्या. तीन मुलांचे शिक्षण सुरू होते. मात्र, त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून श्रीनिवास यांनी केबल व्यवसायात बिले वसुलीचे काम सुरू केले. तिन्ही मुलांच्या शिक्षणासाठी या दांपत्याने प्रसंगी व्याजाने पैसे आणले, मात्र त्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. यादरम्यान मोठा मुलगा बालाजीने सीडब्ल्यूएचे शिक्षण पूर्ण केले. 2015 पासून तो नोकरीत स्थिरावला व तेव्हापासून या कुटुंबाचा आर्थिक ओढाताण कमी होण्यास मदत झाली. बालाजी हा बंगळूरमध्ये नोकरीला आहे. दुसरा मुलगा अंबादासने बीई इलेक्‍ट्रिकची पदवी घेतली व पुण्यात नोकरी करत आहे.

सीए आर्टिकलशिप करत एम. कॉम.ची घेतली पदवी
हरिकृष्णाचे प्राथमिक शिक्षण श्री समर्थ विद्यामंदिर येथे तर माध्यमिक शिक्षण
लोकसेवा हायस्कूल येथे झाले. मोठे बंधू बालाजी यांच्या इच्छेनुसार त्यांनी सीए होण्याच्या दिशेने शिक्षण घेण्यासाठी संगमेश्‍वर महाविद्यालयातून वाणिज्य शाखेला प्रवेश घेतला. बी.कॉम.नंतर पुण्यात राहून सीए आर्टिकलशिप तीन वर्षांचे प्रशिक्षण घेत त्याने पुणे युनिव्हर्सिटीतून एम.कॉम. पूर्ण केले. सध्या सोलापुरातील बीएमआयटी कॉलेजमधून एमबीए दुसऱ्या वर्षाचे शिक्षणही सुरू आहे. पुणे येथे 2011 मध्ये बी.कॉम.चे शिक्षण घेत सीए परीक्षेसाठी आयपीसीसी क्‍लास लावली व सोलापूर विभागातून परीक्षा दिली. सीए परीक्षेसाठी प्रा. आनंद भांगरिया यांचे मार्गदर्शन त्याला लाभले.

सॅटेलाइट क्‍लास सुरू करणार
आई-वडील व भावांच्या मार्गदर्शनाने सीए परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो. अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीतून आई-वडिलांनी आम्हा भावंडांना शिक्षण दिले. आता सोलापूरला येऊन सॅटेलाइट क्‍लास सुरू करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा विचार आहे.
- हरिकृष्णा रच्चा, सीए

कष्टाचे मिळाले फळ
दोन मुले शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागली. आता तिसरा मुलगाही सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे खूप आनंद झाला आहे. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना जे लागेल ते दिले. प्रसंगी कर्ज काढले. आमच्या कष्टाचे आम्हाला फळ मिळाले असे आम्ही समजतो.
- श्रीनिवास व चंद्रकला रच्चा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT