The villagers are demanding completion of the road in Ratanjan village.jpg 
सोलापूर

रातंजन ते हिंगणी या तीन किलोमीटर रस्त्याचे काम अर्धवट; रस्ता पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी !

कुलभूषण विभूते

वैराग (सोलापूर) : बार्शी तालुक्यातील रातंजन येथील रातंजन ते हिंगणी (अंबाबाई मंदिर) हा रस्ता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून तीन किमी मंजूर होऊन त्याचे काम डिसेंबर 2016 मध्ये पूर्ण झाल्याचे दाखवले आहे. परंतु हा रस्ता अर्धवट आणि बंद अवस्थेत असून सदरील रस्ता तीन ठिकाणी खचून पावसाच्या पाण्याने वाहून गेला आहे. रस्ता पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी होत आहे.

रस्त्याचे काम अर्धवट राहिलेले असून रस्त्यावरील दोन पूल वाहून गेले आहेत. मोठ-मोठे खड्डे पडून पुलाखालील पाणी वाहून जाण्यासाठी टाकलेल्या मोठ्या नळ्या उघड्या पडलेल्या दिसत आहेत. त्यामुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. 
 
रस्त्या अभावी या भागातील शेतकऱ्यांना या रस्त्याने जाणे येणे, मालाची वाहतूक करणे, शेतीची अवजारे, बैलगाडी, ट्रॅक्टर इ.साहित्य किंवा वाहन घेऊन आपल्या शेतामध्ये जाता येत नाही. शेतीची सर्व कामे करण्याकरता अत्यंत त्रासदायक होत आहे. याबाबत रस्त्याची पाहणी करून रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी रातंजन येथील शेतकरी गिरीश शेषराव बडवे व महादेव सुबराव खडके आणि या गावातील 209 शेतकऱ्यांनी लेखी निवेदन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री, जिल्हाधिकारी सोलापूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, बार्शी पंचायत समिती आदींना दिलेले आहे. तरीही अद्याप या रस्त्याचे दुरुस्ती, बंद असलेले काम पूर्ण झालेले नाही, त्यामुळे  शेतकऱ्यांची फार मोठे अडवणूक होत आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Hike India : मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा फटका ! देशात LPG सिलिंडर दरात वाढ, जाणून घ्या आजचे ताजे दर

Sports News: अपयशी कर्णधाराचा शिक्का लागला असता; राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागचे मत

Pimpri Education News: डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक संशोधनावर चर्चासत्र

Akola News:क्रीडा शिष्यवृत्तीतही बॉक्सरांचाच दबदबा; जिल्ह्यातील ४३ खेळाडूंपैकी तब्बल २१ बॉक्सरांची निवड

Satara Politics:साताऱ्याच राजकारण तापणार! भाजप,राष्ट्रवादी-शिवसेना पुन्हा आमने-सामने; जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीकडे लक्ष..

SCROLL FOR NEXT