bibtya 
सोलापूर

कंदर येथे बिबट्या सदृश्य प्राण्यांचा वावर; शेतकऱ्यांमध्ये घबराट

पांडुरंग भगत

कंदर-ता.करमाळा (सोलापूर) : येथील कदम वस्ती येथे रविवारी सकाळी शेतकरी राजाभाऊ कदम यांना बिबट्यासदृष्य प्राणी दिसला. त्यानंतर वनविभागाचे  अधिकारी यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर सोमवारी वनविभाग आधिकारी यांनी पाहणी करून पायाचे ठसे असलेले फोटो घेतलेले आहेत.

त्यानंतर मंगळवारी सकाळी गणेश सांगडे या शेतकऱ्याची एक शेळी या प्राण्याने फस्त केली आहे, या घटनेमुळे कंदर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. यामुळे रात्रीच्या वेळी शेतातील जनावरांना धोका निर्माण झाला आहे.

कंदर येथे बिबट्या सदृश्य प्राण्यांचा वावर झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहेत. यावेळी सर्वांनी सावधानता बाळगत गावातील युवकांना व शेतकऱ्यांना बिबट्या दिसल्याची माहिती दिली. वनविभागाला या घटनेची माहिती कळवण्यात आली, त्यानंतर त्यांनी पाहणी केली आहे. यावेळी तलाठी उमेश बनसोडे, पोलीस पाटील धन्यकुमार सुरवसे, राजाभाऊ कदम, संदेश कदम व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. 


संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India A Squad: ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार हार्दिक पांड्या; ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यांसाठी भारतीय अ संघ जाहीर

DK Shivakumar: मंत्र्यावर EDची रेड पडताच मुख्यमंत्री डीके शिवकुमार संतापले; म्हणाले, आता आम्ही घाबरणार नाही...

Manoj Jarange : ‘एकनाथ शिंदे शहाणे व्हा’; मनोज जरांगेंचा संताप, उदय सामंतांनाही सुनावलं !

Numerology: बुध ग्रहाचा प्रभाव अन् तल्लख बुद्धी! तर्कशक्तीत असतात पटाईत; 'या' मूलांकाच्या लोकांमध्ये असते प्रचंड Curiosity....

Kisan Rail: किसान रेल नावालाच! शेतमालासाठी ३१ टक्केच वापर, व्यापारी वाहतुकीला प्राधान्य

SCROLL FOR NEXT