Violence against Police Patil FIR in Akalkot 
सोलापूर

'त्या' चावट पोलिस पाटलाचा पराक्रम; मुलींना अशा प्रकारे करायचा हाय 

सकाळ वृत्तसेवा

अक्कलकोट (सोलापूर) : सोशल साइटवर मुलींच्या नावे बनावट खाते उघडून त्यावर फोटो व व्हिडिओ टाकून त्याखाली अश्‍लील मॅसेज टाइप करून फिर्यादीची मुलगी व तिची मैत्रीण यांच्या मनास लज्जा वाटेल, अशी माहिती प्रसारित केली म्हणून बासलेगाव (ता. अक्कलकोट) चे पोलिस पाटील व त्याचा मित्र अशा दोघांवर दक्षिण पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की गुन्हा दाखल झालेल्या दोघा संशयितांची नावे पोलिस पाटील कुंभार व त्याचा मित्र प्रशांत कवडे अशी आहेत. मैत्रिणीच्या नातेवाइकाच्या लग्नानिमित्त फिर्यादीची मुलगी व तिची मैत्रीण उडगी (ता. अक्कलकोट) येथे जात असताना संशयित दोन्ही आरोपींनी त्यांना थांबवून पोलिस पाटील असल्याचे सांगून त्यांच्याशी झोंबाझोंबी केल्याचा व्हिडिओ काढला होता. ही घटना 2 फेब्रुवारी 2019 रोजी घडलेली होती. हा व्हिडिओ डिलिट करण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून त्यांनी किंवा त्यांच्या इतर कोणी अज्ञात साथीदारांनी फिर्यादीच्या मुलीच्या नावे व इतर फेक खाते सोशल साइटवर उघडून पोलिस पाटील कुंभार याने 2 फेब्रुवारी 2019 रोजी शूटिंग केलेले व्हिडिओ व्हायरल केलेले होते. त्याखाली अश्‍लील मेसेज टाइप केलेले दिसत होते. त्यानंतर त्यांनी इतर तीन अकाऊंट व फिर्यादीच्या मुलीच्या नावाने सोशल साइटवर अकाउंट उघडून अश्‍लील संदेश टाइप केलेले फिर्यादीला दिसले. त्यामुळे बदनामी केली म्हणून संशयित दोन्ही आरोपींवर दक्षिण पोलिस ठाण्यात फिर्यादीने गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपी कुंभार यास अटक करण्यात आलेले आहे. संशयित आरोपीवर माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विजय जाधव तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT