vitthal rukmini devotee head back to home from pandharpur esakal
सोलापूर

Pandharpur Wari 2024 : जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता! जड अंतकरणाने भाविकांनी घेतला पंढरीचा निरोप

आषाढी एकादशीला चंद्रभागेतील स्नानाची पर्वणी व लाडक्या विठुरायाच्या दर्शनाने तृप्त झाल्यानंतर द्वादशी दिवशी गुरुवारी (ता.१८) भाविक परतीच्या प्रवासाला निघाले होते. "जातो माघारी पंढरीनाथा!

राजकुमार घाडगे

पंढरपूर : आषाढी एकादशीला चंद्रभागेतील स्नानाची पर्वणी व लाडक्या विठुरायाच्या दर्शनाने तृप्त झाल्यानंतर द्वादशी दिवशी गुरुवारी (ता.१८) भाविक परतीच्या प्रवासाला निघाले होते. "जातो माघारी पंढरीनाथा! तुझे दर्शन झाले आता" अशी भावना व्यक्त करीत जड अंत:करणाने लाखो भाविकांनी येथील चंद्रभागा बस स्थानक परिसरात गर्दी केली होती.

आषाढी एकादशीच्या सोहळ्यामध्ये यावर्षी १५ लाखाहून अधिक भाविक सहभागी झाले होते. एकादशीला श्री विठ्ठल दर्शन घेतल्यानंतर द्वादशीला उपवास सोडून भाविकांनी परतीची वाट धरली होती. मात्र मानाच्या दिंड्या पौर्णिमेपर्यंत पंढरपूर मुक्कामी असणार आहेत.

गोपाळपूर येथे गोपाळकाला केल्यानंतरच मानाच्या पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. दरम्यान पंढरपूर रेल्वे स्थानक व चंद्रभागा बस स्थानक परिसरात आपापल्या गावी परत जाण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

एस टी महामंडळ प्रशासनाने यंदा देखील नवीन चंद्रभागा बसस्थानकासहित चार ठिकाणी तात्पुरती स्थानके उभारली होती. भीमा, चंद्रभागा, विठ्ठल व पांडुरंग बस स्थानक येथून परतीच्या प्रवासाला जाणाऱ्या भाविकांसाठी ज्यादा बस गाड्या सोडण्यात आल्या होत्या.

त्यामुळे चंद्रभागा बस स्थानकामध्ये दरवर्षीच्या तुलनेत यंदा गर्दी कमी जाणवत होती. तर रेल्वे प्रशासनाच्या वतीने देखील आषाढी यात्रा संपवून परत निघालेल्या भाविकांसाठी ज्यादा रेल्वे गाड्यांची सोय केली आहे.

दरम्यान आपापल्या गावी जाण्यापूर्वी भाविकांनी श्री विठ्ठल मंदिर परिसरातील प्रासादिक वस्तूंच्या दुकानातून चुरमुरे, बत्तासे, सुगंधी अगरबत्ती, हळद कुंकू, बुक्का व विभूती, तुळशी माळा, देवी देवतांचे फोटो आदी प्रासादिक साहित्य खरेदी केले. आषाढी यात्रेला यंदा भाविकांची विक्रमी गर्दी झाली होती.

आषाढी एकादशी व द्वादशी दिवशी पावसानेही विश्रांती घेतल्याने भाविकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. आषाढी यात्रा कलावधीमध्ये प्रसादिक साहित्याच्या बाजारपेठेत चांगली उलाढाल झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

जतन व संवर्धनाच्या कामासाठी श्री विठ्ठल मंदिर सुमारे दोन महिने बंद होते. त्या कालावधीमध्ये भाविकांची संख्या घटल्याने व्यापाऱ्यांचे व्यवसाय ठप्प झाला होता. मात्र यावर्षी आषाढी यात्रा काळात अपेक्षित व्यवसाय झाल्याने नुकसान भरून निघाले.

- सागर ताठे- देशमुख, ताठे अगरबत्ती, पंढरपूर

महाराष्ट्र शासनाने ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीने मोफत प्रवासाची सुविधा दिल्यामुळे आम्ही जेष्ठ नागरिक मंडळी आषाढी यात्रेला आलो होते. यंदा यात्रेला गर्दी प्रचंड असल्याने आम्ही श्री विठ्ठल मंदिराच्या शिखराचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो आहोत.

- शामराव देवराव रिठे, रा.औंढा, जि.हिंगोली

आज परतीच्या प्रवासासाठी चंद्रभागा बस स्थानकामध्ये आलो होतो. एस टी महामंडळाने ज्यादा बस गाड्या सोडल्यामुळे लगेच बस मिळाली. त्यातही महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत असल्यामुळे ग्रुपने आषाढी यात्रेला येणे शक्य झाले.

- सपना विष्णू साजेकर, रा.पाली, ता. सुधागड, जि.रायगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : जुगाराचे उलटे दान

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2025

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २३ ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ - मराठी राशी भविष्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 23 ऑगस्ट 2025

SCROLL FOR NEXT