vitthal rukmini temple closed worry among shopkeepers and traders of market  Sakal
सोलापूर

Pandharpur News : विठुरायाच्या दर्शन बंदमुळे बाजारपेठेवर परिणाम

पंढरपुरातील स्थानिक दुकानदार अन्‌ व्यापाऱ्यांमध्ये चिंता; अर्थकारण ठप्पची भीती

- भारत नागणे

Pandharpur News : श्री विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन शुक्रवार (ता. १५)पासून सुमारे दीड महिना बंद राहणार आहे. त्याचा थेट परिणाम पंढरपूरच्या अर्थकारणावर होणार आहे. त्यामुळे स्थानिक दुकानदार आणि व्यापाऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

विठ्ठल मंदिर संवर्धन आणि जतन करण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून वेगाने सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून देवाच्या गाभाऱ्यातील कामाला शुक्रवारपासून सुरवात केली जाणार आहे. त्यामुळे विठ्ठल आणि रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद राहणार आहे.

सुमारे दीड महिना दर्शन बंद राहण्याची शक्यता आहे. या काळात भाविकांची संख्या देखील कमालीची घटणार आहे. त्याचा थेट परिणाम स्थानिक दुकानदारांच्या व्यवसायावर होणार आहे. पंढरपूरचे अर्थकारण हे आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री प्रमुख चार यात्रा आणि दैनंदिन येणाऱ्या भाविकांच्या संख्येवर अवलंबून आहे.

कोरोना काळात सुमारे एक वर्षभर मंदिर बंद होते. त्याकाळात स्थानिक दुकानदार आणि व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यानंतर मंदिर संवर्धनाच्या कामासाठी सुमारे दीड महिना देवाचे पदस्पर्श दर्शन बंद राहणार आहे.

या काळात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या कमी होणार आहे. त्याचा थेट परिणाम प्रासादिक वस्तू, हार फुले, पेढा, चिरमुरे, बत्तासे, उदबत्ती यासह इतर साहित्य विक्री करणाऱ्या छोट्यामोठ्या दुकानदारांच्या व्यवसायावर होणार आहे.

मंदिर परिसरात सुमारे तीनशेहून अधिक छोटी-मोठी दुकाने आहेत. येथे येणाऱ्या भाविकांवरच त्यांचा व्यवसाय अवलंबून आहे. भाविकांची संख्या घटली तर त्यांचा व्यवसाय या काळात ठप्प राहण्याची भीती आहे.

याबरोबरच मंदिराच्या उत्पन्नात देखील मोठी घट होण्याची शक्यता आहे. अलीकडच्या काळात राज्यासह परराज्यातून विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. वर्षभरात सुमारे एक कोटीहून अधिक भाविक पंढरपूरला येतात.

तर प्रत्येक दिवशी सुमारे ४० ते ५० हजार भाविकांची ये-जा होते. त्यातून पंढरपूर शहरातील हॉटेल, लॉज, रिक्षा यासह इतर व्यवसायिकांना मोठा रोजगार मिळतो. परंतु आता सुमारे दीड महिना विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद राहणार असल्याने पंढरपुरातील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प होण्याची भीती स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

पंढरपूरची अर्थव्यवस्था ही विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर अवलंबून आहे. मंदिर संवर्धन कामामुळे देवाचे दीड महिना दर्शन बंद राहणार आहे. त्याचा थेट परिणाम मंदिर परिसरातील अनेक छोट्यामोठ्या दुकानदारांवर होणार आहे. या काळात भाविकांची संख्या कमी होणार असल्याने अर्थकारण ठप्प होण्याची भीती आहे.

- कपिल देशपांडे, पेढे विक्रेते, पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT