गोकुळाष्टमीनिमित्त फळा-फुलांनी सजले विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर ! Canva
सोलापूर

गोकुळाष्टमीनिमित्त फळा-फुलांनी सजले विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर !

गोकुळाष्टमीनिमित्त फळा-फुलांनी सजले विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर !

भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

देवाचा गाभारा, प्रवेशद्वार, सोळखांबी, सभामंडप यासह संपूर्ण मंदिर फुलांनी सजविण्यात आले आहे.

पंढरपूर (सोलापूर) : गोकुळाष्टमी (Gokulashtami) आणि श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवार निमित्ताने आज (सोमवार) पंढरपूर येथील श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरात (Vitthal-Rukmini Temple) विविध फळांसह (Fruits) देशी - विदेशी फुलांची (Flowers) आकर्षक सजावट करण्यात आली आहे. हवेली तालुक्‍यातील टाळगाव चिखली येथील पांडुरंग रत्नाकर मोरे व बबन मोरे या भाविकांच्या वतीने ही सजावट करण्यात आली आहे. फळा - फुलांच्या सजावटीमुळे देव नटला आहे.

देवाचा गाभारा, प्रवेशद्वार, सोळखांबी, सभामंडप यासह संपूर्ण मंदिर फुलांनी सजविण्यात आले आहे. झेंडू, ऑर्केड, कार्नेशियन, शेवंती, कामिनी, ऍथोरियम, गुलाब, आष्टर, जिप्सोफेलिया, तुळस व गड्डी फुले अशा 2000 किलो देशी - विदेशी फुलांचा आणि पानांचा वापर करून मंदिर सजवण्यात आले आहे. तर मोसंबी, सफरचंद, अननस, सीताफळ, कलिंगड व संत्री अशा 500 किलो फळांचा वापर या सजावटीसाठी करण्यात आला आहे. रंगीबेरंगी फुले आणि विविध फळांच्या सजावटीमुळे देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दीड वर्षापासून मंदिर कधी खुले तर कधी बंद असल्यामुळे भाविकांना दर्शन घेता आले नाही. आषाढी व कार्तिकी वारीमध्येही मंदिर दर्शनासाठी बंद होते. त्यामुळे श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी आजही बंदच आहे. त्यामुळे भाविकांना नामदेव पायरीपासूनच श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मातेचे दर्शन घ्यावे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT