Vitthal worship at the hands of MLA Thakur on the occasion of Chaitri Ekadashi 
सोलापूर

चैत्री एकादशीनिमित्त आमदार ठाकूर यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा : (Video)

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : चैत्री एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची नित्य पूजा आमदार सुजितसिंग ठाकूर यांच्या हस्ते तर श्री रुक्मिणीची पूजा मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली.
चैत्री एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणीचा गाभारा हजारो गुलाबाच्या फुलांनी आकर्षक रित्या सजविण्यात आला. याप्रसंगी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी, मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चैत्री यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात वारकऱ्यांची गर्दी होऊन

संसर्ग वाढू नये या हेतूने कोणीही वारकर्‍यांनी यात्रेसाठी पंढरपूरला येऊ नये, असे आवाहन प्रशासन आणि अनेक दिग्गज महाराज मंडळींनी केले होते. या आवाहनानुसार आज कोणीही वारकरी एकादशी असलीतरी पंढरपूरला आलेले नाहीत. चैत्री एकादशीच्या निमित्ताने चंद्रभागेत स्नानाची पर्वणी साधण्यासाठी चंद्रभागेच्या वाळवंटात दरवर्षी लाखो वारकऱ्यांची दाटी होत असते. यंदा मात्र चंद्रभागेच्या वाळवंटात एकही वारकरी आल्याचे चित्र दिसत नव्हते. यात्रेच्यावेळी वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून जाणाऱ्या रस्त्यांवर आज निरव शांतता पाहायला मिळत आहे. केवळ तीन ते चार लोकांना सोबत घेऊन काही महाराज मंडळींनी शासनाच्या नियमाचे पालन करत नगर प्रदक्षिणा  सोहळा पूर्ण केला.  इतिहासात प्रथमच यंदा कोरोना मुळे यात्रेत असे चित्र पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VAIBHAV SURYAVANSHI: ११ चेंडूत अर्धशतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी फायनलमध्ये 'असा' झाला आऊट; नक्की काय घडलं?

ChatGPT मध्ये मोठं अपडेट! आता वेळेवर मिळणार सगळे अलर्ट; जाणून घ्या कसं काम करतंय हे फीचर? आहे तुमच्या फायद्याचं

नॅशनल हायवे अन् एक्सप्रेस वेवर हवामानानुसार बदलणार वेग मर्यादा; उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान

BEST Bus: 'नीट' परीक्षेसाठी 'बेस्ट'ची विशेष सेवा; २४ मार्गांवर ६० अतिरिक्त बसेस, दिवसभरात १८० फेऱ्यांचे नियोजन

Akole Leopard Attack: लेक किंचाळली अन् वडील धावले! बिबट्याच्या तावडीतून ४ वर्षीय अवनीची सुटका; अकोल्यातील थरारक घटना..

SCROLL FOR NEXT