Gambling 
सोलापूर

वळसंग पोलिसांचे एकाच दिवसात दोन जुगार अड्ड्यांवर छापे; 13 जणांसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त 

श्याम जोशी

दक्षिण सोलापूर (सोलापूर) : कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) हद्दीत सुरू असलेल्या दोन जुगार अड्ड्यांवर एकाच दिवशी कारवाई करत वळसंग पोलिसांनी सुमारे तीन लाख 53 हजार 880 रुपयांच्या मुद्देमालासह 13 जणांना अटक केली. 

वळसंग पोलिसांनी नुकतेच टवाळखोर, रेकॉर्डवरचे आरोपी, मटका, दारू, जुगार यासह अन्य अवैध व्यावसायिकांची माहिती देण्याचे आवाहन केले होते. त्याच अनुषंगाने बुधवारी (ता. 7) वळसंग पोलिसांना कुंभारी गावातील मल्लू जमादार यांच्या शेतात सात ते आठ जण मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोलिसांनी छापा टाकला असता दोन आरोपी पळून गेले तर तीन आरोपी सापडले. या वेळी मुरलीधर रामदास गलमय (वय 40, रा. 19/6, क विभाग, विडी घरकुल, कुंभारी), श्रीनिवास गुंडली (वय 40, रा. लक्ष्मीनारायण टॉकीज, एमआयडीसी), रोहित चंद्रकांत मेघजी (वय 28, रा. घोंगडेवस्ती) या तिघांवर कारवाई करत त्यांच्याकडून आठ हजार 610 रुपये रोख रक्कम, तीन मोबाईल, तीन मोटरसायकल असा एकूण एक लाख 46 हजार 610 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

वळसंग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिरीष मानगावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजय हंचाटे, पोलिस कॉन्स्टेबल सूर्यकांत बिराजदार, फिरोज इनामदार, अश्‍फाक मियावाले, लक्ष्मण काळजे, दिनेश पवार यांनी ही कारवाई केली. 

दरम्यान, दुसरी कारवाईही कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) शिवारातील रिलायन्स कॅन्सर हॉस्पिटलच्या समोरील मैदानात करण्यात आली. येथे आठ ते दहा जण गोलाकार बसून मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे समजल्याने पोलिसांनी कारवाई केली. त्यामध्ये जमीर शेख (वय 44, रा. रविवार पेठ, सोलापूर), अलीम जरतारघर (वय 40, रा. साखर पेठ, सोलापूर), मोहम्मद बिल्लेवाले (वय 19, रा. सत्तर फूट रोड, सोलापूर), आसिफ जकलेर (वय 31, रा. शनिवार पेठ, सोलापूर), महंमद बागवान (वय 40, रा. साखर पेठ, सोलापूर), मोहंमद शेख (वय 23, रा. रविवार पेठ, सोलापूर), असलम मुल्ला (वय 43, रा. रविवार पेठ), सैपन इरकल (वय 35, रा. तेलंगी पाच्छा पेठ, सोलापूर), परवेज पेरमपल्ली (वय 29, रा. पाथरूट चौक, सोलापूर), सादिक नाईकवाडी (वय 22, रा. साखर पेठ) यांच्यावर कारवाई करत त्यांच्याकडून 12 हजार 620 रोख रक्कम, 10 मोबाईल, दोन रिक्षा असा एकूण दोन लाख सात हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

पोलिस कॉन्स्टेबल सय्यद, पोलिस कॉन्स्टेबल गायकवाड, पोलिस नाईक माने, पोलिस कॉन्स्टेबल गुंड यांनी ही कारवाई केल्याची माहिती वळसंग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अजय हंचाटे यांनी दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT