mahapur 
सोलापूर

अतिवृष्टी, महापुराच्या नुकसान भरपाईपासून वाळूजचे शेतकरी अद्यापही वंचितच ! 

रमेश दास

वाळूज (सोलापूर) : अतिवृष्टी आणि महापुराच्या नुकसान भरपाईपासून वाळूजचे शेतकरी अद्यापही वंचितच राहिले असून, ही मदत कधी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असतानाच, ग्रामपंचायतींसाठी आचारसंहिता लागू झाल्याने महापुरातील नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. 

11 डिसेंबरपासून राज्यात पुढील महिन्यात होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने नुकसान भरपाईसाठी आता निवडणुका संपण्याची वाट पाहावी लागणार आहे. वास्तविक पाहता वाळूज (ता. मोहोळ) येथे भोगावती व नागझरी नद्यांचा संगम असल्याने दोन्ही नद्यांना आलेल्या महापुराचे पाणी प्रचंड वेगाने वाहिले. त्यामुळे नद्याकाठची शेती, पिकांचे तसेच काढणी करून ढेप लावलेले व मळणी करून ठेवलेले शेकडो पोती सोयाबीन तसेच इतर शेतीपिके वाहून गेली. ऊस, द्राक्ष, आंबा व पेरू आदी बागांचे मोठे नुकसान झाले. 

मोहोळ तालुक्‍यातील भीमा, सीना आणि भोगावती नदीकाठच्या गावांना परतीच्या पावसाने आलेल्या महापुराचा फटका सर्वाधिक बसला. तालुक्‍यातील सर्वच गावांतील पिकांचे नुकसान झाले. गुरे वाहून गेली. झालेल्या नुकसानीपोटी मोहोळ तालुक्‍यासाठी शासनामार्फत 44 गावांतील बाधित शेतकऱ्यांना 17 कोटी, तर घरात पाणी घुसून घरांची झालेली पडझड आणि मृत जनावरांसाठी चार कोटी रुपये असे एकूण 21 कोटी रुपयांच्या निधीचे वाटप बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. मात्र महापुराने सर्वाधिक नुकसान वाळूज (ता. मोहोळ) येथील शेती आणि शेतातील पिकांचे झाले होते. वाळूजपासून पाच किलोमीटरवरील देगाव येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातच नुकसान भरपाई मिळाली; मात्र वाळूज, भैरववाडी व मनगोळी येथील शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत. या गावांना मदत कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

पंचनामे करण्यासाठी लागलेला वेळ आणि नुकसानग्रस्तांच्या यादीत होणारा हस्तक्षेप यामुळे प्रशासनास वेळेवर यादी न पाठवल्यानेच वाळूज (ता. मोहोळ) येथील शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत. 
- संदीप कादे, 
माजी सरपंच, वाळूज (ता. मोहोळ) 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

SCROLL FOR NEXT