Wanted to move from London to the village but 
सोलापूर

लंडनहून गावी यायची खूप इच्छा होती, पण...

महासिद्ध साळवे

कुसूर (ता. दक्षिण सोलापू, जि. सोलापूर) : कोरोनाचा वाढता संसर्ग व गावाकडून आई-वडील व भाऊ यांचा वारंवार येणारा फोन व काळजी यामुळे मायदेशी येण्याचा निर्णय घेतला. मात्र, विमान सेवा खंडित झाल्याने या ठिकाणी राहूनच कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी घरी राहूनच काम करत असल्याची प्रतिक्रिया लंडन येथे वास्तव्यास असलेले कुसूर (ता. दक्षिण सोलापूर) येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर अरुण संगप्पा बिराजदार यांनी दिली. 
अरुण बिराजदार हे गेल्या सात वर्षांपासून रीडिंग (लंडन) या शहरात इंजिनिअर म्हणून एका कंपनीत कार्यरत आहेत. रीडिंग शहरात ज्या वेळी कोरोना विषाणूची लागण झाली, त्या वेळी कोरोना विषाणूचा संसर्ग हा 70 वर्षे वयोगटातील व्यक्तीला, रक्तदाब, हृदयविकार असणाऱ्या व्यक्ती अशांना धोका असल्याने तेथील प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. मात्र, प्रत्यक्षात या विषाणूने सर्वत्र थैमान घातल्याने सध्या या ठिकाणी जनता घराच्या बाहेर पडत नाही. येथील सर्व शाळा, महाविद्यालये बंद असून विद्यार्थ्यांना व्हिडिओ कॉलिंगद्वारे शिक्षण चालू असून 21 एप्रिलनंतर येथील शाळा सुरू होणार आहेत. 
अत्यावश्‍यक सेवेतील दवाखाने, औषध दुकान, किराण मालाची दुकाने चालू आहेत. मात्र, या दुकानावर लोकांची गर्दी नसून सर्व वस्तू ऑनलाइन खरेदी करून घरपोच मिळत आहेत. त्यांच्यापासून कोरोनाचा संसर्ग होऊन म्हणून योग्य ती काळजी घेऊनच त्या वस्तू घरात घेतल्या जात असल्याचे बिराजदार यांनी सांगितले. 

दररोज भावाच्या संपर्कात 
कोरोनामुळे आमचे कुटुंब धास्तावले होते. बाहेरच्या देशातील कोरोनाची लागण दिवसेंदिवस वाढत चालली होती. माझा भाऊ त्याच्या कुटुंबासह रीडिंग (लंडन) येथे वास्तव्यास आहे. कोरोनाच्या धास्तीने आम्ही घरातील आई-वडिलांसह सर्वजण दररोज भावाच्या संपर्कात होतो व त्यांना सर्वांना घराच्या बाहेर न पडण्याचा सल्ला देत काळजी घेण्यास सांगत होतो. गावी येण्याची तयारी केली. मात्र, विमान सेवा बंद झाल्यामुळे ते सर्व जण तेथेच राहिले. मात्र ते सुखरूप आहेत 
- अशोक बिराजदार, कुसूर, ता. दक्षिण सोलापूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT