Veer Dam 
सोलापूर

सावधान..! "वीर'मधून 23 हजार क्‍युसेकचा विसर्ग; "या' नदीकाठच्या लोकांना पात्रात न जाण्याचा इशारा 

संतोष सिरसट

सोलापूर : वीर धरणातून नीरा नदीपात्रामध्ये जवळपास 23 हजार क्‍सुसेकने पाणी सोडले जात आहे. त्यामध्ये जवळपास 50 हजार क्‍सुसेकने वाढ होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नीरा व भीमा नदीपात्रामध्ये कोणीही जाऊ नये, असा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. वीर धरणातून पाणी सोडल्यामुळे भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येण्याची शक्‍यता आहे. 

एकीकडे वीर धरणातून पाणी सोडले आहे तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण पूर्णपणे भरले आहे. त्यामुळे त्या धरणातूनही 11 हजार क्‍सुसेकने पाणी सोडले जात आहे. ते पाणी आता उजनी धरणात येणार असल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे. दोन दिवसांपासून सातारा आणि पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे वीर, भाटघर धरणात येणाऱ्या पाण्यात वाढ झाली आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी वीर धरणामधून नीरा नदीत 800 क्‍सुसेक विसर्ग विद्युतगृहातून सुरू केला होता. सायंकाळी पाच वाजता धरणातून 23 हजार 120 क्‍युसेक इतका विसर्ग केला आहे. 

पुणे जिल्ह्यातील पावसावर उजनी धरणाचे भवितव्य अवलंबून आहे. पावसाळ्याच्या सुरवातीच्या काळात पुणे जिल्ह्यात पाऊस झाला नाही. त्या काळात धरण परिसरात पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली. वजा पातळीमध्ये गेलेले धरण अधिक पातळीत आले आहे. धरणात सध्या दौंड येथून सहा-सात हजार क्‍सुसेकने पाणी उजनी धरणात येत होते. पण, खडकवासला धरणातून पाणी सोडल्यामुळे आता धरणात येणारे पाणी वाढणार आहे. बंडगार्डन येथून भीमा नदीमध्ये 16 हजार 723 क्‍सुसेकने पाणी येत असल्यामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard: महाराष्ट्रातील बिबटे गुजरातला पाठवणार! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, पण प्राणीप्रेमींमध्ये वाद का उफाळला? वाचा प्रकरण...

Nashik Accident : काळाचा घाला! उमराणे उड्डाणपुलाजवळ भीषण अपघात; सिडकोतील एकाच कुटुंबातील तिघांचा अंत

Kalamb News : इस्त्रायल-इराण युद्धाचा धसका, पेट्रोल दरवाढीची अफवा; कळंबमध्ये पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Latest Marathi News Live Update : तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण भविष्यात चांगल्या सेवा देऊ शकतो - एन. चंद्राबाबू नायडू

Kolhapur Market: बंद गाळे बनले कचरा कोंडाळा; अवैध धंद्यांचे ठिकाण, मोठी संपत्ती असतानाही उत्पन्न वाढीसाठी वापर नाहीच

SCROLL FOR NEXT